पुलाचा खर्च 40 कोटींवरून पोहचला 358 कोटींवर

नागपूर (Nagpur) : अमरावती रोडवर 318 कोटी रुपये खर्चून दोन पूल बांधले जात आहेत. या बांधकामाचे टेंडर टीएण्डटी इन्फ्रास्ट्रक्चरला देण्यात आले होते. टेंडरनुसार हा पूल 18 मे 2022 पर्यंत पूर्ण करायचा होता, परंतु बांधकामाचा वेग अतिशय संथ असल्याने काम पूर्ण होण्यासाठी आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. विलंबामुळे खर्चही 40 कोटींवरून 358 कोटींवर पोहोचला आहे.

लॉ कॉलेज चौक ते विद्यापीठ कॅम्पससमोरील पूलाचे काम संथगतीने सुरू आहे. आतापर्यंत केवळ 18 खांब तयार करण्यात आले आहेत. वाडी ते अशोक मोटर्स चौकापर्यंत दुसरा पूल बांधण्यात येत आहे. येथे 34 खांबांचे काम पूर्ण झाले आहे. आतापर्यंत केवळ 25 टक्के काम झाले आहे. या पुलाच्या उभारणीमुळे नागपूर ते अमरावती हे अंतर अवघ्या अडीच तासात पूर्ण होणार आहे. या मार्गावर वाहतुकीचा ताण जास्त असल्याने नेहमीच वाहतूक कोंडी होत असते. गजबजलेल्या व रहिवासी भागात पूल बांधून अमरावतीपर्यंत वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोन उड्डाण पूल लवकरात लवकर तयार करण्याच्या सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्या होत्या.

अमरावती रोडवरील दोन्ही पुलांचे काम 1 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करायचे होते. 2 मार्च 2022 पासून टीएण्डटी, पुणे या कंपनीने बांधकाम सुरू केले. बांधकामाची जबाबदारी राष्ट्रीय महामार्ग (एनएच) पीडब्ल्यूडीकडे देण्यात आली आहे. पहिला पूल लॉ-कॉलेज चौक ते विद्यापिठ कॅम्पस चौक असा सुमारे 2.8 किलोमीटर लांबीचा आहे. येथे एकूण 58 खांब बनवायचे असून त्यापैकी 18 खांबांचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. दुसरा पूल नियंत्रण वाडी ते अशोक मोटर्स चौक असा सुमारे 1.94 किमी लांबीचा आहे. या भागात 48 खांब बनवायचे असून, त्यापैकी 34 खांब तयार झाले आहेत.

टेंडरनुसार दोन्ही पूल 1 मार्च 2024 पर्यंत पूर्ण करायचे होते. कामाला झालेल्या दिरंगाईमुळे 6 महिन्यांचा अतिरिक्त वेळ लागणार आहे. अशात खर्चही 40 कोटींनी वाढणार आहे, अशी माहिती प्रकल्प अधिकारी नरेश बोरकर यांनी दिली.

@ फाईल फोटो

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बेल्यात स्वच्छतेचा धडाका !

Mon Feb 13 , 2023
सरपंच बालपांडे यांचा पुढाकार बेला : नवनिर्वाचित सरपंच अरुण देवराव बालपांडे यांनी सरपंचपदी विराजमान होताच गावात स्वच्छतेचा धडाका सुरू केला आहे. ग्रामपंचायत व एकता नाट्य सांस्कृतिक मंडळाच्या सहकार्याने दर रविवारी ही स्वच्छता मोहीम बेला गावात राबविण्यात येत आहे. काल रविवारला ग्रामपंचायत कार्यालयापासून वार्ड क्रं.२ व स्मशानभूमी पर्यंत स्वच्छता करण्यात आली या कामी बालपांडे सह उपसरपंच प्रशांत लांबट, स्वयंसेविका सविता रोडे, […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!