– चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार, आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांचा नागभीड तालुक्यातील बाळापूर, मिंडाळा, मिंथूर, नवेगाव पांडव व पारडी (ठवरे) येथे प्रचार दौरा तथा कॉर्नर सभा
– वासाळा मेंढा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मच्छिमार सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष सुखरूजी डोंगरवार व काँग्रेस नेते तथा मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर मांढरे यांचा भाजपात पक्षप्रवेश…
नागभीड :- चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार, जनसामान्यांचे कैवारी, सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व, आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी काल नागभीड तालुक्यातील बाळापूर, मिंडाळा, मिंथूर, नवेगाव पांडव व पारडी (ठवरे) येथे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचार दौरा करीत कॉर्नरसभेत स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधला.
स्थानिक ग्रामस्थांशी संवाद साधताना भाजपा-महायुती सरकारने जनसामान्यांच्या फायद्यासाठी केलेली अनेक लोकोपयोगी विकासकामे व राबविलेल्या अनेक जनकल्याणकारी योजनांची माहिती तसेच राज्यातील समस्त जनतेच्या कल्याणासाठी भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या अत्यंत महत्वपूर्ण संकल्प पत्रासंदर्भातील महत्वाच्या मुद्यांची सविस्तर माहिती देत चिमूर विधानसभा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी भाजपा-महायुतीच्या पाठीशी अधिक मजबुतीने उभे राहून पुन्हा एकदा आपला मतरूपी आशीर्वाद द्यावा. तसेच येत्या २० नोव्हेंबर ला कमळ चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन तथा विनंती केली.
या प्रचार दौऱ्याप्रसंगी विविध मंदिर देवस्थान व श्री गुरुदेव सेवा मंडळांना भेटी देऊन मनोभावे दर्शन घेतले आणि सर्व थोर महात्म्यांना विनम्र अभिवादन केले. दरम्यान, समस्त ग्रामवासीयांच्या वतीने आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्यासह विविध मान्यवरांचे उस्फूर्तपणे औक्षण करीत स्वागत तथा शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विविध भाजपा नेते, पदाधिकारी तथा कार्यकर्ते आणि स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मिंडाळा येथील कॉर्नरसभेप्रसंगी चिमूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-महायुतीचे अधिकृत उमेदवार, आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत विकासकार्यावर तथा भारतीय जनता पार्टीच्या विकसनशील ध्येय धोरणांवर विश्वास ठेवून वासाळा मेंढा येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा मच्छिमार सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष सुखरू डोंगरवार व काँग्रेस नेते तथा मच्छिमार सहकारी संस्थेचे अध्यक्ष किशोर मांढरे यांनी भारतीय जनता पार्टीत पक्षप्रवेश घेतला. यावेळी आमदार किर्तीकुमार (बंटीभाऊ) भांगडीया यांनी सुखरू डोंगरवार व किशोर मांढरे यांचे भारतीय जनता पार्टीत सहर्ष स्वागत केले तथा अभिनंदन करीत पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.