विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे यांची जपानच्या महावाणिज्यदूतांनी घेतली सदिच्छा भेट

मुंबई :- जपानचे भारतातील महावाणिज्यदूत यागी कोजी यांनी आज विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. सभापती पदी निवड झाल्याबद्दल कोजी यांनी प्रा. शिंदे यांचे अभिनंदन केले.

सभापती प्रा. राम शिंदे यांनी महावाणिज्यदूत कोजी यांचे स्वागत केले. यावेळी विधिमंडळाचे सचिव (कार्यभार 2) विलास आठवले उपस्थित होते.

जपान भारत यांचे मैत्रीचे संबंध आहेत. महाराष्ट्रासारख्या प्रगतीशील राज्यामध्ये विविध पायाभूत प्रकल्पांमध्ये जपान सहभागी असल्याचा आपल्याला आनंद आणि अभिमान असल्याचे कोजी यांनी यावेळी सांगितले. तसेच मेट्रोच्या उभारणीत जपान संपूर्ण सहकार्य करीत असून लवकरच ते काम पूर्णत्वास येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रा. शिंदे यांनी पर्यटन मंत्री असताना एप्रिल 2016 मध्ये दिलेल्या जपान भेटींना उजाळा दिला. त्यावेळी प्रा. शिंदे यांनी याकोहामा मधील कोयासान विद्यापीठात दिलेल्या भाषणांची आठवण सांगितली. तसेच जपानच्या सहकार्याबद्दल आनंद व्यक्त केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

अनाथ, निराधार मुलांमधून पोलीस अधिकारी घडावेत यासाठी आम्ही मदतीस तत्पर - जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. हर्ष पोद्दार

Thu Jan 16 , 2025
▪️ चाचा नेहरू बाल क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचा शुभारंभ ▪️ सुमारे 350 अनाथ व निराधार मुलांचा स्पर्धेत सहभाग नागपूर :- मुलांनो प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठी संधी दडलेली असते. आपल्याला चांगले व्हायचे आहे, चांगलेच कार्य करायचे आहे अशी मनात खुणगाठ बांधा. मोठी स्वप्न पहा. आपणही एक दिवस चांगला व्यक्ती होऊ हे ध्येय डोळ्यासमोर ठेऊन त्याला प्रयत्नांची जोड द्या. तुमच्या मधून पोलीस […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!