संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कन्हान :- श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस कन्हान, कांद्री शहरात पालखी मिरवणुक काढुन ‘ गण – गण गणात बोते’ “श्री गजानन महाराज की जय” च्या जयघोषात दोन दिवसी विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
श्री गजानन महाराज मंदिर नवयुवक सेवा समिती पांधन रोड कन्हान शहरातील तिवाडे ले आऊट पांधन रोड येथील श्री संत गजानन महाराज मंदिरात दोन दिवसीय कार्य क्रमाने प्रकट दिवस उत्साहा साजरा करण्यात आला . शनिवार दि.(२) मार्च ला सायंकाळी श्री संत गजानन महाराज मंदिरात आरती करुन सप्त खांजरी वादक , राष्ट्रीय प्रबोधनकार ह.भ.प. तुषार सुर्यवंशी यांचा प्रबोधनात्मक कार्यक्रमाने महोत्सवाची सुरूवात करण्यात आली. ह.भ.प. तुषार सुर्यवंशी यांचा प्रबोधन ऐकायला नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते.
दुसऱ्या दिवशी रविवार (दि.३) मार्च ला संत गजानन महाराज यांचा मुर्तिचे जलाभिषेक, कलश पुजन करुन मंदिरातुन पालखी मिरवणुक काढण्यात आली. डोक्या वर शैकडो महिलांनी कलश व पुरुषांनी खांद्यावर “श्री” ची पालखी घेऊन ‘ गण – गण गणात बोते’ “श्री गजान न महाराज की जय” च्या जयघोषात करित मिरवणुक आंंबेडकर चौक, तारसा चौक, इंदिरा नगर, शिवनगर, गहुहिवरा चौक, रामनगर सह मुख्य मार्गाने भ्रमण करून यात्रेचे श्री हनुमान, गजानन मंदिर तिवाडे ले-आऊट पांधन रोड कन्हान येथे समापन करण्यात आले. त्यानंतर भजन कीर्तन, दहिकाला, महाआरती व महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय संत गजानन महाराज यांचा प्रकट दिवस साजरा करण्यात आला.
याप्रसंगी पर्यटक मित्र चंद्रपाल चौकसे, नरेश बर्वे, विजय हटवार, राजेश ठाकरे, प्रशांत मसार, चंद्रशेखर आरगुल्लेवार, भुषण निंबाळकर, चिंटु वाकुडकर, नगरसेविका गुंफा तिडके, रिता बर्वे, गंगाबाई तिवाडे सह मान्यवर नागरिक प्रामुख्याने उपस्थित होते. कार्य क्रमाच्या यशस्वितेकरिता श्री गजानन महाराज सेवा समितीचे दिपक तिवाडे, प्रकाश वंजारी, कार्तिक पिल्ले, मयुर नागपुरे, शरद दुधपचारे, आकाश ठाकरे, कुंदन रामगुंडे, केशव महल्ले, अर्जुन रहाटे सह नगरवासी नागरिकांनी सहकार्य केले.
श्री संत गजानन महाराज मंदिर कांद्री
कांद्री येथील स्वर्गिय सोमाजी गिऱ्हे यांचा शेतातील संत गजानन महाराज मंदिरात दोन दिवसीय प्रकट दिवस कार्यक्रम शनिवार (दि.२) मार्च ला सायं काळी हनुमान मंदिरात विधिवत पूजा अर्चना करुन “श्री” ची पालखी यात्रा काढण्यात आली. महिलांनी, नागरिकांनी खांद्यावर “श्री” ची पालखी घेऊन यात्रा कांद्री परिसरत भ्रमण करुन यात्रेचे वार्ड क्र ५ येथे श्री गजानन महाराज मंदिरात समापन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी रविवार (दि.३) मार्च ला मंदिरात श्री गजानन महाराज यांचा मुर्तिचे रुद्राभिषेक, विधिवत पूजा अर्चना करुन श्री संत गजानन महाराज भजन मंडळ कांद्री द्वारे भजन कीर्तन, हरिपाठ करण्यात आला. गोपालकाला, आरती व महाप्रसाद वितरण करुन दोन दिवसीय कार्यक्रमाने संत गजानन महाराजांचा प्रकट दिवस मोठ्या उत्साहाने थाटात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी रमेश पोटभरे, बलवंत पडोळे, शिवाजी चकोले, वामन देशमुख, राजेश पोटभरे, चंद्रशेखर बावनकुळे, झिबल सरोदे, भगवान चकोले, संकेत चकोले, रोहित चकोले, फजित बावने, सतिश झलके, बबलु बर्वे, दिनेश खाडे, विजय देशमुख, रविंद्र कोतपल्लिवार, प्रफुल गायकवाड, नरेश डांगरे, प्रविण गोडे, मनोज लेकुरवाडे सह शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहकार्य केले.