बाबू हरदास एल एन अमर रहे च्या गजराने दुमदुमले कामठी शहर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 6:-जयभीम नाऱ्याचे जनक बाबू हरदास एल एन यांच्या जयंतीनिमित्त आज 6 जानेवारीला कामठी येथील बाबू हरदास एल एन चौक स्थित जयभीम प्रवर्तक बाबू हरदास एल एन यांच्या पुतळ्याला शहरातील विविध संघटनेच्या वतीने माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यात आले. दरम्यान बाबू हरदास एल एन अमर रहे च्या गजराने कामठी शहर दुमदुमले.

यानुसार कामठी येथील सदभावना ग्रुप व प्रोग्रेसिव्ह मूव्हमेंट च्या वतीने बाबु हरदास एल एन यांना मानवंदना वाहण्यात आली याप्रसंगी सुनील चहांदे, लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी युनूस शेख, सुनील बडोले, राकेश कनोजिया, नरेश फुलझेले, राजेश गजभिये ,विकास रंगारी, कोमल लेंढारे ,सज्जाक शेख, आशिष मेश्राम, सुमित गेडाम, नारायण नितनवरे, प्रदीप फुलझेले, यशवंत मेश्राम, मुन गुरुजी,आदी उपस्थित होते.

कांग्रेस च्या वतीने मानवंदना वाहण्यात आली याप्रसंगी कांग्रेस सेवादल चे महाराष्ट्र प्रदेश सहसचिव राजकुमार गेडाम, कृष्णा यादव,यंग ब्रिगेड सेवादल चे अध्यक्ष आकाश भोकरे, नरेश गजभिये, नरेश ढोके,रवी बावणे, कोमल लेंढारे, प्रमोद खोब्रागडे आदी उपस्थित होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बरीएम तर्फे बाबू हरदास एल एन यांना मानवंदना

Fri Jan 6 , 2023
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी ता प्र 6:-बहुजन रिपब्लिकन एकता मंच तर्फे आज दिनांक ६-१-२०२३ रोजी मोटर स्टैंड चौक कामठी येथे जय भीम चे जनक बाबू हरदास एल एन यांच्या ११९ व्या जयंती निमित्त प्रतिमेला माल्या अर्पण करुण मानवंदना देण्यात आली। याप्रसंगी विदर्भ महासचिव अजय कदम, अफजल अंसारी, कामठी शहर अध्यक्ष दिपंकर भाऊ गणवीर, सचिव सुभाष सोमकुवार, अनुभव पाटिल, मनीष […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com