आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र आढावा दौरा

नवी दिल्ली :- आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई दौ-यावर राहणार आहेत.

27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे.

28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Governor attends Onam Celebration programme

Mon Sep 23 , 2024
Mumbai :- Maharashtra Governor C.P. Radhakrishnan presided over the Onam Celebration programme in Mumbai. The Onam celebration was organised by the Bombay Keraleeya Samaj. The Governor addressed the members and felicitated senior members of the Bombay Keraleeya Samaj. President of the Bombay Keraleeya Samaj Dr. S. Rajasekharan Nair, Honorary Secretary Vinodkumar V Nair, Vice President Pradipkumar, Joint Secretary T A […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com