रिलायन्स पेट्रोलपंप समोर द बर्निंग स्टार बस,सुदैवाने जीवितहानी टळली

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– कामठी – कळमना मार्गावर कळमना शिवारात धावत्या स्टार बसला आग

कामठी :- कामठी नागपूर मार्गावर कामठी वरून नागपूरकडे जात असलेली स्टार बस कळमना शिवारातील रिलायन्स पेट्रोल पंप समोर अचानक ड्रायव्हरच्या बाजूने इंजिन मधून मोठ्या प्रमाणात धूर निघून आग लागली असता चालक ड्रायव्हरने तत्परता दाखवून बाजूला गाडी लावून नागरिकांनी पाण्याचा मारा केल्याने सुदैवाने पुढील मोठी घटना टळली. प्राप्त माहितीनुसार कामठी स्टार बस स्थानकावरून कामठी- कळमना- इतवारी -नागपूर स्टार बस क्रमांक व्हि एन 31 के 0071 दुपारी साडेचार वाजता सुमारास 25 ते 30 प्रवासी घेऊन निघाली कामठी- कळमना मार्गावरील रिलायन्स पेट्रोल पंप पाच वाजता सुमारास अचानक इंजिन मधून धूर निघून मोठ्या प्रमाणात आग लागली असता चालकाने तत्परता दाखवत बस रोडच्या बाजूला उभी करून स्वतः खाली उतरले व महिला वाहकानी गाडीतील सर्व प्रवाशांना मागच्या दाराने बाजूला सुखरूप उतरवले धूर गाडीने मोठ्या प्रमाणात पेट घेतला गाडीत मोठ्या प्रमाणात धुर पसरला होता बाजूलाच एका घराचे बांधकाम सुरू होते त्या घरात मालकाकडून व परिसरातील नागरिकांनी बसवर मोठ्या प्रमाणात पाण्याचा मारा केल्याने पुढील मोठी घटना टळली काही नागरिकांनी घटनेची माहिती कळमना पोलीस स्टेशनला दिली थोड्यावेळाने कळमना पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी आल्याची माहिती उपस्थित नागरिकांनी दिली स्टार बस वाहन चालक व वाहक यांच्या तपटरतेमुळे पुढील मोठी घटना टळल्याचे नागरिकांनी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

NCI च्या संचालकांनी केली करोडोची फसवणूक 

Fri Apr 28 , 2023
नागपूर :- आज नागपूर शहरात सकाळी १०:३० वाजता नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचे उद्घाटन प्रसंगी संचालक ललित टेकचंदाणी नागपूर शहरात येताच तक्रार कर्त्यांना भनक लागताच नागपूर शहर घाटून यांचे विरोधात पत्र परिषदेत धाव घेतली.नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट एनसीआयचे संचालक ललित टेकचंदनी यांनी क्लॅन सिटीच्या रूम खरीदारांना फसविल्या गेले. सर्व मुंबई येथील रहिवाशांची फसवणूक केल्याबद्दल त्यांचे विषयी माहिती परिषदेत दिली. आम्ही सर्व क्लन सिटी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com