संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी
कामठी ;- स्थानिक जुनी कामठी पोलिस स्टेशन हद्दीत येणाऱ्या कामठी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय समोर रस्त्याच्या कडेला अंदाजीत एका 50 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळल्याची घटना काल रात्री 8 दरम्यान निदर्शनास आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेत पुढील उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह शवविच्छेदनगृहात हलविण्यात आले.पोलिसांनी तूर्तास मृत्यूची नोंद केली असली तरी मृत्यूचे कारण अजूनही कळू शकले नाही.