बेपत्ता तरुणाचा मृतदेह आढळला ; देवरी येथील केशोरी तलावाच्या काठावर

अमरदिप बडगे,प्रतिनिधी

गोंदिया –  जिल्ह्यातील देवरी शहरातील केशोरी येथील तलावाच्या काठावर एका युवकांचा मृतदेह आज दुपारच्या दरम्यान आढळून आल्याची दुदैवी घटना घडली आहे.

मृतकाची ओळख पटली असुन मृतक युवकांचे नाव अयान असलम बेग उर्फ अय्यु वय 18 वर्षे असुन तो 27आगष्ट पासून बेपत्ता होता .थोडा मंदबुद्धीचा असल्याची माहिती मिळत आहे.नातेवाईक मित्रा कडे शोध शोध घेतली परंतु थांगपत्ता लागला नाही.आज दुपारी 3च्या दरम्यान अयानचा मृतदेह केशारी गावातील तलावात आढळुन आला असून नातेवाईकांनी त्यांची ओळख पटवून दिली. अयानचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले आहे. सदर घटनेची माहिती मिळताच देवरी पोलिस घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्णालयात पाठविण्यात आले असून पुढील तपास देवरी पोलिस करीत आहेत.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

गोंदिया तील ३५ वर्षीय महिलेवर गोंदिया-भंडारा येथे सामूहिक अत्याचार मधील पहिला आरोपी अटक न झाल्याने धरणे आंदोलन..

Mon Aug 29 , 2022
अमरदिप बडगे, प्रतिनिधी गुन्हा दाखल होऊन २६ दिवस झाले तरीही गोंदिया पोलिसांना पहिल्याला आरोपीला पकडण्यास अपयश.. आंदोलनात २४ सामाजिक संघटनेने घेतला सहभाग गोंदिया – गोंदियातील ३५ वर्षीय महिलेवर गोंदिया-भंडारा येथे सामूहिक अत्याचार करण्यात आले, त्या विरोधात गुन्हा दाखल होऊन २६ दिवस झाले, तरी सुद्धा आरोपी अटक झाला नाही आरोपीचे स्केच तयार करून सुद्धा अद्याप आरोपी फरार आहे. गोंदिया पोलिसांना पहिला […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com