– महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित
नागपुर :- महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालय तर्फे आयोजित ‘६३ व्या महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धे’च्या नागपूर केंद्रात प्राथमिक फेरीत रखुमाई सेवा मंडळ संस्थेतर्फे ‘ द ब्लॅकड इक्वेशन ‘ हे नाटक सादर करण्यात आले. सध्या काहीतरी कारणांमुळे राष्ट्र राष्ट्रांमधला संघर्ष वाढत जात आहे या संघर्षाची परिणीती एके दिवशी आण्विक शस्त्राचा उपयोग होण्यापर्यंत जाणार आहे आणि या अनुहल्ला साधासुधा नाही तर हिरोशिमा झालेल्या हल्ल्यापेक्षा तीन ते चार हजार पट मोठा होणार यामध्ये होणारी प्राणहानी आणि वित्तहानी किती प्रचंड आणि भयंकर स्वरूपाची असेल याचा विचार न केलेलाच बरा. हीच गोष्ट जगातील पहिला अनुभव बनविणाऱ्या शास्त्रज्ञाला भांडवल सोडून गेली.डॉ रॉबर्ट ओपेनहायमर हे शास्त्रज्ञ मॅन हॅटन प्रकल्पाचे प्रमुख या हल्ल्यात हादरून केले आणि याच घटनांचा प्रवास आणि अशा घटना उलगडत जातो दुसऱ्या महायुद्धाची भीषणता दर्शवली जातात.
अनुस्फोट हा शब्द छोटा असला तरी त्याचे परिणाम मात्र येणाऱ्या कित्येक पिढ्यांना भोगावे लागतील आण्विक शास्त्राची या जगाला कुठलीही आवश्यकता नाही असा विचार या नाटकाच्या माध्यमातून सादर करण्यात आला.चंद्रकांत चौधरी लिखित व यशवंत चोपडे दिग्दर्शित या नाटकात यशवंत चोपडे भावना चौधरी सतीश बागडे अमित कुबडे, जयश्री थूल करुणा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या नाटकाचे निर्मिती प्रमुख देवयानी चोपडे चंद्रकांत चौधरी, सूत्रधार विलास कुबडे, नृत्यदिग्दर्शक सतीश बागडे, पार्श्वसंगीत दीप्ती भाके,प्रकाश योजना वृषभ धापोडकर, नेपथ्य देवयानी चोपडे धर्मेंद्र चोपडे, तसेच निर्मिती सहाय्य प्रशांत खडसे सचिन वंजारी, तुषार पाठक, नाना मिसाळ हे होते.
आज शनिवार सायंकाळी ७ वा.राष्ट्रभाषा परिवार सामाजिक सांस्कृतिक संस्था, नागपूर तर्फे सतीश आळेकर आळेकर आणि निकिता ढाकुलकर दिग्दर्शित शनिवार रविवार हे नाटक सादर होईल.सिव्हिल लाइन्समधील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ही नाट्य स्पर्धा सुरू आहे.