नागपूर :- बंजारा समाजाचे थोर संत जगतगुरु सेवालाल महाराज यांच्या जयंती प्रित्यर्थ नागपूर महानगरपालिकेच्या मुख्यालयात जगतगुरु संत सेवालाल महाराज यांच्या फोटोला प्रतिमेला अतिरिक्त आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी पुष्पहार अर्पण करुन विनम्र अभिवादन केले.
यावेळी मुख्य अभियंता राजीव गायकवाड, उपायुक्त निर्भय जैन, रविंद्र भेलावे, सहा. आयुक्त महेश धामेचा, गणेश राठोड जनसंपर्क अधिकारी मनिष सोनी, धनंजय जाधव, विजय राठोड, नितिन राठोड, रोहिदास राठोड, अविनाश जाधव, वैजयंती आडे, विजय जाधव, अनिल चव्हान, गोपाल राठोड, अनिल राठोड, अर्जुन मुडे, गजानन जाधव, विनोद राठोड आदी अधिकारी व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.