नवी दिल्ली :- महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक पुनरुत्थानात मोलाचे योगदान देणारे विचारवंत, झुंझार पत्रकार,आणि साहित्यिक प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती महाराष्ट्र सदनात आज साजरी करण्यात आली.
कोपर्निकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा प्रधान सचिव रूपिंदर सिंग यांनी प्रबोधनकार ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी सहायक निवासी आयुक्त सि्मता शेलार यासह महाराष्ट्र सदनाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सर्वांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून प्रबोधनकार ठाकरे यांना आदरांजली वाहिली.