पारशिवनी :- मौजा ईटगाव येथे फिर्यादी नामे रोशन हरीदास सनेसर, वय ३४ वर्ष रा. ईटगाव ता. पारशिवनी व आरोपी नामे मनीष केशवराव येवले वय २४ वर्ष रा. ईंटगाव ता. पारशिवनी जि नागपुर हे एकाच गावातील असुन यातील आरोपी हा फिर्यादी जवळ आला व तु कंपनीमध्ये असे सांगितले की, मी बाहेर पत्ते खेळत होतो. असे ठेकेदाराला सांगुन माझी बदनामी केली असे बोलुन फिर्यादीस शिवीगाळ करून आरोपीने आपल्याजवळील एक धारधार शस्त्र काढुन अचानक फिर्यादीवर हल्ला केल्याने फिर्यादिचा कान तुटला.
सदर प्रकरणी फिर्यादी यांच्या रीपोर्ट वरून आरोपीविरूद्ध पोस्टे पारशिवनी येथे कलम ११८ (२), ३५२ बी एन एस अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपीस अटक केली आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस अधिक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधिक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे पारशिवनी येथील ठाणेदार राजेशकुमार थोरात, पोउपनि शिवाजी भताने, पोअं विरेंद्रसिंग चौधरी यांनी पार पाडली.