कामठीतील भीम जयंती सोहळा अभूतपूर्व ठरला

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

– माझ्या भीमानं… भीमान माय.. सोन्यानं भरली ओटी-

कामठी :- युगपुरुष,क्रांतिसूर्य,प्रज्ञासूर्य, विश्वरत्न, महामानव, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षीप्रमाणे निघनारी भीम जयंती मिरवणूक यावर्षीसुद्धा मोठ्या जल्लोशात काढण्यात आली होती.कामठी शहरातील प्रत्येक रस्ते हे निळ्या पाखरांनी भरले होते.विविध रस्ते मार्गाने काढण्यात आलेल्या मीरवणुकीमध्ये तरुणाई ढोल ताशांच्या अनं डीजेच्या तालावर थिरकत होती.माझ्या भीमान …भीमान माय..सोन्यानं भरली ओटी अश्या विविध भीमगीतावर तरुणाई बेभान व बेधुंद अशी नाचत होती.जय भीम जय भीम हा नारा आसमंतात गर्जत होता.सर्वत्र उत्साह व जल्लोषाचे चित्र डोळ्यांचे पारणे फेडत होते.जयंती उत्सव सोहळयातील लहान थोरांचा सहकुटुंब सहभाग हा प्रत्येकाचा आनंद द्विगुणित करत होता.

महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा सोहळा हा 14 एप्रिलच्या पूर्वसंध्येच्या रात्री 12 वाजेच्या घडाळ्याच्या ठोक्यापासूनच सुरुवात करण्यात आला.विविध वस्त्यातुन जयभीम चा जयघोष करीत निघालेल्या मिरवणुका ह्या जयस्तंभ चौकात पोहोचताच विविध प्रकारच्या विद्दुत रोषणाईने सजवून असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात 132 किलो च्या भव्य केक कापुन भीमजयंतीचा जल्लोष करण्यात आला.यावेळी या डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसराला मिनी संविधान चौकाचे स्वरूप प्राप्त झाले होते तर या मिनी संविधान चौक स्वरूप निर्मितीसाठी माजी नगरसेवक रघुवीर मेश्राम,माजी नगरसेविका प्रतिभा मेश्राम धीरज मेश्राम,आकाश मेश्राम,यासह इतर सामाजिक संघटनेच्या पदाधिकारी व भीम उत्साही तरुणांनी मोलाचे सहकार्य केले.14 एप्रिल ला सकाळी 7 वाजेपासूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन वाहण्यासाठी हजारोच्या वर संख्येत निळ्या पाखरांची गर्दी जमली होती.डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन वाहण्यासाठी विविध पक्षाचे लोकप्रतिनिधी,विविध राजकीय,सामाजिक।संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांनी पुष्पहार अर्पण करून महामानवास अभिवादन केले.तर सायंकाळी 7 वाजता प्रबुद्ध नगर येथून सार्वजनिक भीम जयंती मिरवणूकीचा शुभारंभ करण्यात आला.या मिरवणुकीत प्रबुद्ध नगर,नया बाजार,जयभीम चौक, कामगार नगर,बुद्धनगर,रमानगर,भीमनगर,रामगढ,आनंद नगर, कुंभारे कॉलोनी, हरदास नगर,येरखेडा,रणाळा आदी भागातुन काढण्यात आलेल्या मिरवणुका एका पाठोपाठ मार्गभ्रमन करीत जयस्तंभ चौक स्थित डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ मिरवणुकीचे समापन करण्यात आले तर या मिरवणुकीचे कांग्रेस,शिवसेना,वंचित बहुजन आघाडी,बहुजन रिपब्लिकन एकता मंच,यासह विविध सामाजिक राजकीय संघटनेद्वारे स्वागत करण्यात आले.मिरवणुकीत लहानांपासून ते प्रौढापर्यंतचे आंबेडकरी अनुयायी शुभ्र पांढरे वस्त्र परिधान करून निळे फेटे बांधून जयभीम चा जयघोष करीत डी जे च्या तालावर तरुणाई थिरकताना दिसले तसेच या सर्व मिरवणुका डोळ्याचे पारणे फेडत होते.तर दरवर्षीप्रमाणे यावर्षीचाही भीम जयंती सोहळा अभूतपूर्व ठरला.मिरवणुका सुव्यवस्थित पार पडाव्या यासाठी पोलीस विभागातर्फे नवीन कामठीचे पोलीस निरीक्षक कमलाकर गड्डीमे, जुनी कामठी पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक दीपक भिताडे यांच्या नेतृत्वात विशेष पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बांबूचे ‘मास प्रॉडक्‍शन’ गरजेचे - नितीन गडकरी  

Sun Apr 16 , 2023
बांबू क्षेत्रात उल्‍लेखनीय कार्य करणा-या ‘त्रिमूर्तीं’चा सत्‍कार  बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्‍ट्र चॅप्‍टरचे आयोजन  नागपूर :- बांबूवर विविध प्रयोग होत आहे. पण मार्केट उपलब्‍ध होत नाही. बांबूचे ‘मास प्रॉडक्‍शन’ केले, सामान्‍यांच्‍या उपयोगासाठी त्‍यात संशोधन करून दर्जेदार किफायतशीर उत्‍पादने तयार केली तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल, ग्रामीण व आदिवासींसाठी लाभदायी ठरले व बांबू ‘इकॉनॉमी’ उभी असा विश्‍वास केंद्रीय मंत्री नितीन […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com