3 वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या आधारे मिळणार शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ

– मनपा घरकुल विभागाची माहिती

चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिका हद्दीत गावठाण क्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या ज्या लाभार्थ्यांकडे जमीनीची मालकी नाही अशा लाभार्थ्यांना मागील 3 वर्षाच्या मालमत्ता कर पावतीच्या (टॅक्स पावती) आधारे, मनपा कार्यालयात अर्ज करुन घरकुलाचा लाभ (रु.2.50 लक्ष अनुदान) देण्यात येत आहे.

आदिवासी उपयोजनेंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत, जे अनुसूचित जमातीचे लोक, कुडा मातीच्या घरात, झोपड्यांमध्ये किंवा तात्पुरत्या तयार केलेल्या निवाऱ्यात राहतात अशा अनुसूचितील पात्र लाभार्थ्यांना घरकुल उपलब्ध करुन देण्यासाठी वैयक्तिक लाभाची राज्य शासनाची “शबरी आदिवासी घरकुल योजना” चंद्रपूर शहर महानगरपालिका अंतर्गत राबविण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे चंद्रपूर शहरात अनुसूचित जमातीतील जागा उपलब्ध नसणाऱ्या नागरिकांना गावठाण क्षेत्रांतर्गत बांधण्यात आलेल्या (बांधण्यात येणाऱ्या) सदनिकांमध्ये (फ्लॅट्स) शबरी आदिवासी घरकुल योजनेचा लाभ घेण्याकरिता मनपा कार्यालयात घरकुल मागणीसाठी रितसर अर्ज करुन रु. 2.50 लक्षचा लाभ मिळविता येईल.

चंद्रपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, सदर योजनेबाबत आवश्यक माहिती जसे योजनेसाठी पात्रता,उत्पन्न मर्यादा, आवश्यक कागदपत्रे इत्यादींकरिता चंद्रपूर शहर महानगरपालिका कार्यालय, सात मजली इमारत, प्रथम माळा, घरकुल विभाग येथे संपर्क साधावा .

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

Futala Lake to Be Measured for Encroachment Removal Today

Mon Feb 24 , 2025
– Survey Possibly the First in Over a Century Nagpur :- In what is likely the first official measurement in over a century, Futala Lake…also known as Telangkhedi Lake..will be surveyed by Land Records Department (City Survey Office Number-3) today. The survey will also cover a portion of the lake’s catchment area to facilitate removal of encroachments and reclaim possession […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!