वाहन जाळून नुकसान करणाऱ्या आरोपीस अटक

नागपूर :- पोलीस ठाणे सिताबर्डी हद्दीत हाऊस नं. ६९, आंबेडकर नगर, व्हीआयपी रोड, धरमपेठ, नागपूर येथे राहणारे फिर्यादी निलेश मदनलाल हिरनवार वय ४३ वर्ष यांनी त्यांचे घरासमोर, रोडवर त्यांची स्कुटी पेप क. एम. एच ३१ ई. जे ६९२३ पार्क करून ठेवली असता अज्ञात आरोपीने फिर्यादीची गाडी जाळुन अंदाजे ७,०००/- रू चे नुकसान केले. फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरूध्द पोलीस ठाणे सिताबर्डी येथे कलम ३२६ (एफ) भा.न्या.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सिताबर्डी पोलीसांनी गुप्त बातमीदारा मार्फत मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मयुर श्याम हिरनवार वय ३८ वर्ष रा. गवळीपूरा, शितला माता मंदीर जवळ, धरमपेठ, नागपूर वास ताब्यात घेवुन विचारपूस केली असत्ता आरोपीने जुन्या वादाचे कारणावरून वरील गुन्हा केल्याची कबुली दिली. आरोपीस अटक करण्यात आलेली आहे. पुढील तपास सुरू आहे.

वरील कामगिरी पोलीस उप आयुक्त (परि. क. २) व सहा. पोलीस आयुक्त (सिताबर्डी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, वपोनि. चकाटे, पोनि, मिर्जापुरे, पोउपनि, तिवारी, शिंदे, पोहवा, त्रिपाठी, पो.अं. रंभापूरे, मांडवकर व रमन खैरे यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

रामगिरी बाबांच्या आक्षेपार्ह वक्तव्या विरोधात मुस्लिम बांधवांचा निषेध मोर्चा

Sun Sep 1 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- रामगिरी महाराज यांनी मुस्लिम धर्म अनित्यांचे दैवत नबी यांच्या बद्दल जे वाईट उदगार काढले त्याचा निषेध करण्यासाठी काल कामठी येथे महाराष्ट्र प्रदेश युवक कांग्रेस चे पूर्व महासचिव मो इर्शाद शेख यांच्या नेतृत्वात पोलीस स्टेशन वर शांतीपूर्ण मोर्चा नेत पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे यांच्याशी भेट घालून रामगिरी बाबा वर कायदेशीर कार्यवाही करण्याचे निवेदित करण्यात आले.दरम्यान […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com