नागपूर :- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून विधानसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्यासोबत ज्येष्ठ नेते व केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी,भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. दिवसभरात भाजपाच्या एकूण 12 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले.
मुंबई भाजपाचे अध्यक्ष ॲड. आशीष शेलार यांनी अर्ज दाखल करण्यापूर्वी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी ॲड. प्रतिमा शेलार उपस्थित होत्या. विधानसभा अध्यक्ष आमदार राहुल नार्वेकर यांनी कुलाबा मतदारसंघातून अर्ज दाखल केला.यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रभारी भूपेंद्र यादव,ज्येष्ठ नेते व माजी आ.राज पुरोहित उपस्थित होते.
त्याचबरोबर नालासोपारा येथून राजन नाईक तर अकोला पूर्व येथून भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. हरिष पिंपळे, वसंत खंडेलवाल, विप्लव बाजोरिया आदि मान्यवर तसेच कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.
रावेरमधून अमोल जावळे,अचलपूरमधन प्रविण तायडे,देवळी येथून राजेश बकाने, संभाजीनगर येथून विद्यमान गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी अर्ज दाखल केला. त्यांच्या समवेत खा.डॉ.भागवत कराड उपस्थित होते. दौंड येथून राहुल कुल, कर्जत जामखेड येथून प्रा. राम शिंदे, औसा येथून अभिमन्यू पवार यांनी आपले अर्ज दाखल केले.