कामठी तालुक्यातील गावागावात रामनामाचा गजर

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी :- अयोध्येत 22 जानेवारी रोजी भगवान श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भागात रामनामाचा एकच जल्लोष करण्यात आला.यानिमित्ताने संपूर्ण तालुका राममय झाला होता.

कामठी तालुक्यात काल सकाळपासूनच विविध मंदिरामध्ये धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.तसेच शोभायात्रा,रॅली,महाआरती ,भजनपूजन,महाप्रसाद व गावभोजनाचे सुद्धा आयोजन करण्यात आले होते.एकंदारीत संपूर्ण तालुका राममय झाला होता.कामठी शहरासोबतच ग्रामीण भागातील प्रत्येक गावात रामलल्लाचा एकच जल्लोष पाहायला मिळाला.

पाचशे वर्षाचा संघर्ष आणि दीर्घ प्रतीक्षेनंतर अयोध्येत 22 जानेवारीला रामलल्ला विराजमान झाले.हा महाउत्सव देशभर साजरा करण्यात आला.याच पाश्वरभूमीवर कामठी तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.तसेच कामठी शहरात भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले होते.ही शोभायात्रा गंज के बालाजी मंदिरातून प्रारंभ होऊन शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करीत मोदी राम मंदिरात पोहोचली. शोभायात्रेचे ठिकठिकाणी रामभक्तांकडून स्वागत औक्षण करण्यात आले.शहरातील प्रत्येक मंदिरात साफसफाई करीत आतीषबाजी,रोषणाई करण्यात आली.संपूर्ण मंदिरामध्ये आरतीसुद्धा करण्यात आली राम नामाच्या गजरात शोभायात्रेतील हजारो महिला व पुरुष अबाल वृद्ध सहभागी होत तल्लीन झाले होते.सायंकाळी ठिकठिकाणी भोजन आणि महाप्रसाद वितरण करण्यात आले.तसेच घरासमोर रांगोळी, पताका सह घरावर रामध्वज यामुळे कामठी तालुक्यातील शहर तसेच ग्रामीण भाग भगवामय झाला होता.तसेच दरम्यांन कायदा व सुव्यवस्था नियंत्रणात राहावे यासाठी नवीन कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद पोरे तसेच जुनी कामठी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक भिताडे व सहकारी पोलिस अधिकारी कर्मचारी विशेष लक्ष केंद्रित करून होते.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निवडणुकीसाठी 'तयार है हम'!

Tue Jan 23 , 2024
संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी  कामठी :- आज 23 जानेवरीला लोकसभेची अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून रामटेक लोकसभा अंतर्गत येणाऱ्या कामठी-मौदा विधानसभामध्ये मोडनाऱ्या कामठी-मौदा-नागपूर मध्ये एकूण 499 बूथ अंतर्गत 4 लक्ष 60 हजार 525 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.या मतदारांचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आगामी रामटेक लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्धार करीत आयपासूनचव तयारी सुरू केली आहे.त्यातच प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी पक्ष आपल्यालाच संधी देणार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com