गांजा बाळगणाऱ्या आरोपींना अटक

– गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाची कामगिरी 

 नागपूर :- गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे अधिकारी व अंमलदार यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहीतीवरून, पाळत ठेवून पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत खाली प्लॉट नं. १२, आर्यनगर, जरीपटका, नागपूर येथे गांजाची देवान घेवान करतांना आरोपी १) उमरेखान अब्दुल रशीद खान, वय ३० वर्षे, २) दरक्षा अंजुम उर्फ राणू खान उमेर खान वय २९ वर्ष दोन्ही रा. कांजीहाऊस चौक, रमाईनगर, यशोधरानगर, नागपूर ३) शेख रिजवान शेखा युनूस वय २४ वर्ष रा. ईस्लामीक चौक, जुनी वस्ती वडनेरा, जि. अमरावती ४) अब्दुल आरीफ बल्द अब्दुल खालीक वय ३२ वर्ष, रा. आजरी माजरी बाबा दिवान मस्जिद जवळ, यशोधरानगर, नागपूर हे शेवरोलेट कुड़ा कार क. एम.एच १२ जि.जी ०४०० व टाटा हेक्झा कार क. एम.एच ४९ बी. वी ०६११ ने येवुन त्यांचे गाड्यांमध्ये गोण्या भरतांना समक्ष मिळुन आले. नमुद गोण्यांनी पाहणी केली असता, त्यामध्ये ९३ किलो १२० ग्रॅम गाँजा किंमती अंदाजे १८,६२,४००/- रू. चा दिसुन आला. आरोपींचे ताब्यातुन गांजा, चार वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन व नमुद दोन्ही वाहने असा एकुण किंमत्ती अंदाजे ४१,०२,४००/- रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपोंची अधिक विचारपुस केली असता, नमुद गांजा हा पाहीजे आरोपी ५) मोहम्मद जुनैद ईब्राहीम राजवानी, वय ३१ वर्षे, रा. शिवनगर, यशोधरानगर, नागपुर ६) काशीफ अहमद रा. ताजनगर, जि. अमरावती, ह.मु.. जाफर नगर, नागपूर याचे मदतीने अंमली पदार्थाची खरेदी-विक्री करीत असल्याचे सांगीतले. आरोपी क. ५ याचा शोध घेवुन त्यास सुध्दा ताब्यात घेतले, आरोपींचे हे कृत्य कलम ८ (क), २०(ब), (२) (क), २९ एन.डी. पी.एस. कायद्यानुसार होत असल्याने, आरोपींविरूध्द पोलीस ठाणे जरीपटका येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी क. १ ते ५ यांना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपींना मा. न्यायालया समोर हजर करून त्यांची दिनांक २३.०९.२०२४ पर्यंत पोलीस कोठडी प्राप्त करण्यात आली आहे. पाहिजे आरोप क. ६ वाचा शोध सुरू आहे. आरोपींचा गुन्हे अभिलेख तपासला असता, आरोपी क. १ याचेविरूध्द अग्नीशस्त्र बाळगणे, शरीराविरूध्द चे गुन्हे तसेच, त्यास सन २०१८ साली ०१ वर्षाकरीता नागपुर शहर व ग्रामीण ह‌द्दीतुन हद्दपार केल्याचे दिसुन आले. तसेच, आरोपी क. २ हिचेविरूध्द शस्त्र बाळगणे, मारहाण करून जखमी करणे, अश्लील शिवीगाळ करून धमकी देणे असे गुन्हे दाखल असल्याचे दिसुन आले. तसेच, आरोपो क. ४ याचे विरूध्द एन. डी.पी.एस. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. तसेच, आरोपी क. ५ याने विरूध्द अपहरण करून जबरी संभोग करणे याबाबत गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. तसेच, आरोपी क. ६ याचे विरूध्द एन.डी.पी.एस. अन्वये गुन्हा दाखल असल्याचे दिसुन आले. वरील नमुद आरोपी क. १,२,४,५ व ६ हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले.

वरील कामगिरी रविन्द्रकुमार सिंगल, पोलीस आयुक्त नागपूर शहर, संजय पाटील अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) नागपूर शहर, राहुल माकणीकर, पोलीस उप आयुक्त (डिटेक्शन), अभिजीत पाटील, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखाली, गुन्हेशाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोनि. गजानन गुल्हाने, सपोनि. मनोज घुरडे, पोहवा. विजय यादव, मनोज नेवारे, शैलेय डोबोले, नितीन साळुंके, पवन गजभिये, विवेक अढाऊ, मपोहवा. अनुप यादव, नापोअं, गणेश जोगेकर, अरविंद गेडेकर, पोअं. रोहीत काळे, सहदेव चिखले, शेषराव रेवतकर व सुभाष जगभिये यांनी केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगारास अटक, एकुण ०५ गुन्हे उघडकीस

Mon Sep 23 , 2024
नागपूर :- पोलीस ठाणे जरीपटका हद्दीत प्लॉट नं. १२७, नूरी कॉलोनी, मस्जिद जवळ, जरीपटका, नागपूर येथे राहणारे फिर्यादी नामे सोहेल असलम खान वय ३५ वर्षे हे त्यांचे राहते घराला कुलूप लावुन परिवारासह सौदी अरेबीया येथे उमरा करीला गेले होते. दिनांक ०९.०८.२०२४ रोजी फिर्यादीचे मित्र त्यांने घरी गेले असता, पराचे कुलूप तुटलेले दिसल्याने, चोरी झाले याबाबत फिर्यादीस सुचना दिलेली होती. दिनांक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!