मोतीराम व्ही रहाटे, प्रतिनिधी
– वेकोलि सुरक्षा रक्षकांची कारवाईत कोळसा, ओमनी कार सह ४०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त.
कन्हान :- शहरातील राष्ट्रीय महामार्गावरील धन्यवाद गेट जवळ कांद्री येथे गोंडेगाव खुली कोळसा खदान येथील कोळसा चोरी करुन ओमनी कारमध्ये भरुन नेतांना वेकोलि कामठी खुली खदान सुरक्षा कर्मचा-यानी पाठलाग करून आरोपीस पकडुन त्यांचे जवळुन १३०० किलो कोळसा व ओमनी कार असा एकुण ४०,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करुन कन्हान पोली सांनी आरोपी अजय सरोदे विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरु केला आहे.
प्राप्त माहिती नुसार फराज इफतखार अहमद वय २२ वर्ष राह. जे.एन.रोड.वारीसपुरा कामठी यांचे सह निखिल वैद्य, सचिन चचाने, अविनाश पिंगळे व चालक पियुष राहाटे यांची रात्री १२ ते सकाळी ८ वाजे पर्यंत नाईट ड्युटी असतांना परिसरात पेट्रोलिंग करताना बुधवार (दि.१०) मे ला पहाटे सकाळी ०३ वाजता धन्यवाद गेट कांद्रीला वेकोलि कामठी खुली खदान सुरक्षा कर्मचारी यांना कोळसा भरुन ओमनी कार क्र. एम एच -३६ – ४०४४ हे वाहन येतांना दिसले. वेकोलि सुरक्षा कर्मचा-यांनी गाडीचा पाठलाग करून ते वाहन राष्ट्रीय महामार्गावरील दिपांशु हार्डवेयर कांद्री कन्हान येथे पकडले. वेकोलि सुरक्षा कर्मचा-यांनी ओमनी कार वाहनाला थांबवुन त्यातील चालक अजय दर्या सरोदे वय २८ वर्ष राह. शिवनगर कांद्री यास ओमनी कार मधील कोळसाबाबत आरोपी अजय ला विचारले असता त्याने गोंडेगाव खुली खदान येथुन आणल्या चे सांगितले. वेकोलि कामठी खुली खदीन चे सुरक्षा कर्मचारी यांनी ओमनीकार मधील १३०० किलो कोळसा १०,४०० रु व ओमनी कार किंमत ३०,००० रु असा एकुण ४०,४०० रुपयांचा मुद्देमाल घटना स्थळावरुन जप्त करुन आरोपी अजय सरोदे यास पकडुन पोलीस स्टेशनला आणले. सदर प्रकरणी कन्हान पोलीसांनी फिर्यादी फराज अहमद यांचे तक्रारी वरून पोस्टे ला आरोपी अजय सरोदे विरुद्ध अप क्र.२७०/२३ कलम ३७९ भादंवि अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांचे मार्गदर्शनात कन्हान पोलीस करीत आहे.