जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या आरोपींना अटक

नागपूर :- फिर्यादी नरेश खेमचंद पाठक वय २० वर्ष रा. कस्तुरबा नगर, प्लॉट न. २११, जरीपटका, नागपुर हे घरी हजर असतांना त्यांना घराबाहेर आवाज आल्याने ते व त्यांचा भाऊ रवि पाठक वय २२ वर्ष व आई आरती पाठक वय ४२ वर्ष हे तिथे घराबाहेर आले असता त्यांचे घराजवळ राहणारा राजु बिसाऊ शाहु वय ३२ वर्ष याचे सोबत अॅक्टीवा गाडीवरून आलेले आरोपी १) विशाल अभिमान दमगाने वय २४ वर्ष रा. इंदिरानगर, गल्ली न. ६ जरीपटका २) राजन बलरामसिंग कक्कड़ वय २० वर्ष रा. म्हाडा कॉलोनी, प्लॉट नं. २७४ कपिलनगर ३) साहिल मुजात अंसारी वय २३ वर्ष रा. बाबा दिपसिंग नगर, म्हाडा कॉलोनी यांनी संगणमत करून राजु शाहू याला अज्ञात कारणावरून लाकडी दंडा व हातबुक्का तसेच चाकुने त्यांचे हातावर पोटावर वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून गंभीर जखमी केले, फिर्यादी हे भांडण सोडविण्यास गेले असता आरोपिंनी त्यांना लाकडी काठीने मारून जखमी केले. फिर्यादीचा भाऊ रवि व आई हे सोडविण्यास आले असता रविचे गळ्यावर चाकुने मारून जखमी केले व फिर्यादीची आई आरती हीचे उजवे हातावर चाकूने मारून जखमी केले. सर्व जख्मींचा उपचार मेयो हॉस्पीटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तकारीवरून पो. ठाणे जरीपटका येथे पोउपनि सांस्कृतायन  यांनी आरोपीविरुद्ध कलम ३०७, ३२४, ३२३, २९४, ३४ भादवि सहकलम १३५ म.पो.का अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. पुढील तपास सुरू आहे

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

निष्काळजीपणामुळे मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल.

Tue Jul 25 , 2023
नागपूर :- पोलीस ठाणे हुडकेश्वर हद्दीत पर्ल हेरीटेज सोसायटीचे बाजुला, कान्हा सेलीब्रेशन जवळील मोकळया पॉट वरून फिर्यादीचे वडील कन्हैयालाल रामचंद्र मटाले वय ६७ वर्ष रा. हेरीटेज सोसायटी टाउन क. ए १५९. कान्हा सेलीब्रेशन जवळ, उमरेड रोड, नागपूर हे पायदळ जात असता तेथे अनाधिकृतरित्या टाकलेल्या ईलेक्ट्रीक वायरचा करंट लागल्याने मरण पावले होते. मृतक यांचे मृत्यूस आरोपी २) महा ईलेक्ट्रीसिटी बोर्ड तर्फे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com