नागपूर :- पारशिवनी येथील फिर्यादी नामे विकास रूपराव सहारे वय १९ वर्षे, रा. दहेगाव यांच्या रिपोर्ट वरुन पो.स्टे. पारशिवनी येथे अप. क्र. २९१/१८ कलम ३०७, ३२४, ३२३ भादवि कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
यातील फिर्यादी नामे विकास सहारे रा. दहेगाव हा आपल्या साथीदारांसह बसला असता यातील आरोपी नामे- सागर लीलाधर सहारे वय १९ वर्षे, रा. दहेगाव हा फिर्यादी जवळ आला व तु पोळयाच्या दिवशी कोमल भुजाडे याच्या सोबत का होता असे म्हणून फिर्यादीला जीवानिशी मारण्याच्या उद्देशाने त्याच्या जवळ असलेल्या धारदार चाकु सारखे हत्याराने वार केले असता फिर्यादीने डाव्या हाताने अडविण्याचा प्रयत्न केला असता फिर्यादीचे डाव्या हातावर व छातीवर तसेच फिर्यादीची आई सोडविण्याकरिता आली असता आरोपीने तिला सुध्दा उजव्या कोध्याजवळ व डाव्या हाताला चाकुने मारून जख्मी केले.
सदर प्रकरणाचे तपास पोनि दिपक मस्के यानी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे. ११ भोसले (पाटील) सा. कोर्टामध्ये सादर केले. आज दिनाक २३/०४/२०२४ रोजी मा. डी. जे. ११ भोसले (पाटील) सा. यांनी वरील नमुद आरोपीला कलम ३०७ भादवी मध्ये ४ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रू. दंड दंड न भरल्यास ३ महीने कारावास कलम ३२४ भादवी मध्ये १ वर्ष सश्रम कारावास व ५०००/- रू. दंड दंड न भरल्यास ३ महीने कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी माहुलकर यांनी काम पाहीले, कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणुन मपोहवा स्मिता मोहनकर यांनी मदत केली आहे.