नागपूर :- दिनांक २१/०८/२०२४ चे ०२.३० वा. ते ०३.०० वा. दरम्यान मौजा बाजारगाव येथे आरोपी नामे- हर्षद किरण माणे वय २४ रा. सांगवळे ता. करवीर जि. नागपुर याने चोरी करण्याचे उद्देशाने बैंक ऑफ इंडिया बाजारगाव येथील बँकेचे जिन्या जवळील काय काढुन बँकेचे समोरील दरवाज्याचे कुलुप तोडुन आतमध्ये चोरी करण्याचे उद्देशाने प्रवेश केला. अशा फिर्यादी नामे सौ. जया अभिषेक ठवरे, वय ३७ वर्ष रा. मेश्राम ले आउट नागपुर यांचे रोपोर्ट वरून पोस्टे कोंडाळी येथे कलम ३३१ (४), ३०५, ६२ वीएनएस अन्वये गुन्हा नोंद केला होता. सदर घटनेची माहिती मिळताच कोंढाळी येथील पोलीस पथक यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचुन आरोपी नामे- हर्षद किरण माणे वय २४ रा. सांगवळे ता. करवीर जि. नागपुर यास बाजारगाव येथुन ताब्यात घेतले.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनाखाली पोस्टे कोंढाळी येथील ठाणेदार सपोनि. राजकुमार त्रिपाठी, पोउपनि देशमुख, सफी सरोदे, पोअं. नासरे यांनी पार पाडली. गुन्हयाचा पुढील तपास सफौ सुनिल बंसोड हे करीत आहे.