सावनेर :- पोलीस स्टेशन सावनेर येथे फिर्यादी नामे मुकुल जयवंत गोतमारे वय २४ वर्ष रा बोरगाव ता कळमेश्वर यांनी दिनांक १०.०८.२४ से १३.३० ते १२.५० वा दरम्यान आपली मोटर सायकल क एम एच ३१ सीयु ४६५० किमती ३००००/-रू ची ऋषी ठाकरे यांचे झेरॉक्स दुकानाचे समोर लॉक करून ठेवली असता कोणीतरी अज्ञात आरोपीने सदरची मोटरसायकल चोरून नेल्याचे रिपोर्ट वरून सदर गुन्हा नोंद करून तपासात होता. सदर गुन्हयाचा सखोल तपास केला असता, व आजुबाजुच्या परीसरात विचारपुस केली असता सदर नमुद गाडी ही आरोपी नामे अंकुश शंकर धुर्वे वय २४ वर्ष रा आजनी ता सावनेर याने चोरून नेल्याचे माहीती मिळाल्याने सदर आरोपीस ताब्यात घेवुन विचारपुस केल्याने त्याने नमुद मोटरसायकल चोरून नेल्याचे सागितल्याने त्यास नमुद गुन्हयात अटक करण्यात आली असुन त्याचे कडुन दुचाकी वाहन जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हयातील पुढील तपास पोलीस हवालदार बन्सोड हे करीत आहे.
सदरची कार्यवाही ही पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष ए. पोद्दार (भापोसे), अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ यांचे मार्गदर्शनात पोस्टे सावनेर येथील ठाणेदार पोलीस निरीक्षक रविद्र मानकर व त्यांचे स्टाफ यांनी पार पाडली.