नागपूर :-पो.स्टे. काटोल दि. ३०/०९/२०२२ चे १७/२१ वा. दरम्यान फिर्यादी नामे सर तर्फे पोहवा प्रभुदास दलाल यांच्या रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन काटोल येथे अप. क्र. ७३५/२२ कलम ३०२, ३४ भादंवी कायद्यान्वये गुन्हा नोंद झालेला होता.
दिनांक २९/९/२०२२ चे १६/०० वा. ते दि. ३०/०९/२०२२ चे ०९/५९ वा. दरम्यान यातील फिर्यादी हे पो.स्टे. काटोल येथे तपास पथक अधिकारी म्हणुन कर्तव्यावर हजर असता संतोष वाघमारे रा. ह. मु. नगर परीषद कॉम्प्लेक्स मध्ये, कॉन्वेंट स्कूल चे बाजुला यांनी पोस्टे काटोल येथे येवुन माहिती दिली की नगर परीषद कॉम्प्लेक्स जवळ एक इसम पडुन आहे. यावरून घटनास्थळी जावुन पाहणी केली असता सदर मृतक इसम नामे रोहीत नारायण बेंबळकर वय ४६ वर्ष रा. तळेगाव जि. अमरावती ह. मु. काटोल यास कोणीतरी अज्ञात इसमांनी अज्ञात कारणावरून गंभीररित्या मारहान करून जिवानिशी ठार केल्याचे रिपोर्ट वरून कलम ३०२ भादंवि प्रमाणे गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान निष्पन्न झाले की मृतक व आरोपी हे सरकारी दवाखाना काटोलचे बाजुला असलेल्या नगर परीषद दुकान चाळमध्ये राहत असुन भिक मागुन तसेच भंगार जमा करण्याचे काम करीत होते. दि. २९/०९/२०२२ रोजी आरोपी क २) याचे पत्नीला मृतक हा दारू पिवुन शिवीगाळ करीत असता आरोपी क १) संतोष रमेश वाघमारे वय २४ वर्ष रा. तळेगाव जि. अमरावती व २) मोहनलाल रामाधर विश्वकर्मा वय ६२ वर्ष रा. लालगाव (एम.पी.) ह. मु. काटोल यानी पत्नीला का शिवीगाळ करतो व दारू पिवुन बडबड का करतो या कारणावरून आरोपीतांनी संगनमत करून हातबुक्कीने व लाकडी चौपाटीने मृतक यास जबर मारहान केल्याने मृतक हा ३०/०९/२०२२ चे ०९/५९ वा. पर्यंत घटनास्थळी पडुन होता, असे तपासात निष्पन्न झाल्याने कलमवाढ करण्यात आली.
सदर प्रकरणाचे तपास पोनि महादेव आचरेकर यांनी करून सदर प्रकरण न्याय प्रविष्ठाकरीता मा. डी. जे १० मा. आर. आर. बोसले साा. कोर्टामध्ये सादर केले. दिनांक ०२/०७/२०२४ रोजी मा. डी. जे १० मा. आर. आर. भोसले यांनी सदर गुन्हयात आरोपी क. १ व २ यांना कलम ३२६, ३४ भादंवी मध्ये ०४ वर्षे सश्रम कारावास व ३०००/- रू. दंड, दंड न भरल्यास ०६ महीणे सश्रम कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे.
सरकारचे वतीने एपीपी शेंद्रे यांनी काम पाहीले. कोर्ट कामात पैरवी अंमलदार म्हणून पोशि प्रमोद कोहळे यांनी मदत केली आहे.