जीवानीशी ठार करणाऱ्या आरोपीतांना अटक

सावनेर :- अंतर्गत ०६ कि. मी अंतरावरील सोनापूर ते अदासा मंदीर शासकीय रोप वाटीका जवळ दिनांक २८/०९/२०२३ चे १४.०० वा. ते १५.०० वा. दरम्यान फिर्यादी अतुल वामनराव गायकवाड, ३६ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ सोनपुर पोस्ट आदासा ता. कळमेश्वर पो.स्टे सावनेर यांचा मोठा भाऊ मृतक अमोल – वामनराव गायकवाड, वय ३७ वर्ष, रा. वार्ड क्र. ३ सोनपुर (आदासा) याला आरोपा  १) अंकीत अरूण कडु, २) प्रवीन रमेश उईके आणि ३) प्रभाकर मधुकर कोहळे तिन्ही रा. सोनपूर आदासा सावनेर यांनी दारू पिण्याकरीता पैसे मागीतल्याचे कारणावरून फिर्यादीच्या भावा सोबत भांडण करून, मारहाण केली तसेच फिर्यादीचे भावाचे सांगण्यावरून फिर्यादी त्यांना समजाविण्यासाठी गेला असता, वर नमुद आरोपीतांनी फिर्यादीला हातबुक्कीने व काठीने पाठीवर आणि डोक्यावर मारून जखमी केले तसेच फिर्यादीचे भावाला हातबुक्कीने, लाकडी काठीने व दगडाने मारून गंभीर जखमी करून जिवानिशी ठार मारले आहे. त्याच प्रमाणे आरोपीतांनी फिर्यादीची मोटरसायकल घेवुन तेथून पळून गेले..

सदर प्रकरणी फिर्यादी यांचे रिपोर्ट वरून पोस्टे सावनेर येथे आरोपीतांविरुद्ध कलम ३०२, ३२४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपीतांना अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शरद भरमे हे करीत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी पीक विम्याचा अग्रीम जमा करणार - धनंजय मुंडे

Mon Oct 2 , 2023
– नागपूर जिल्हयातील शेतीच्या नुकसानाची कृषि मंत्र्यांकडून पाहणी नागपूर :- राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विमाचा २५ टक्के अग्रीम दिवाळीच्या आत जमा करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज येथे केले. २३ सप्टेंबर रोजी नागपूर महानगर व जिल्हयात झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसानंतर शेतीच्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार या परिसरातील पाहणी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com