अमरदिप बडगे, प्रतिनिधी
सुदैवाने जीवितहानी नाही ; तबल एक तास नंतर दुसरी रुग्ण वाहिका घटना स्थळी दाखल
गोंदिया :– गोंदियाच्या शासकीय महाविद्यालयातुन एका रुग्णाला 108 रुग्णवाहिकेने नागपुर येथील मेडिकल कॉलेज येथे घेवुन जात. असताना गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील तुमखेडा येथे चालत्या रुग्ण वाहिकेचा अचानक मागचा चाक निघाल्याची घटना घडली आहे. अपघातानंतर रुग्णवाहिका तब्बल 100 मीटर पर्यंत तिन चाकावर चालक गेली. विशेष म्हणजे रुग्ण वाहिकेत र 62 वर्षीय जनिराम कांबळे हा ऑक्सिजन लावलेला रुग्ण होता. इतर चार लोक तर एक चालक व एक डॉक्टर बसुन होते, नशीब बलवत्तर होते म्हणून मोठा अपघात झालेला नाही व काही जीवित हानि झाली नाही.
दरम्यान एका तासानंतर दुसरी रुग्णवाहीका घटना स्थळी आल्याने रुग्णाला नागपूरला पाठविण्यात आले आहे.