दरोडा गुन्हयातील फरार आरोपींना बुट्टीबोरी पोलीसांनी केले जेरबंद

बुट्टीबोरी :- पोस्टे अप क्र. ५८३/२३ कलम ३९५, ५०४, ५०६, ३२३ भादंवीचा गुन्हा दिनांक १३/८/२०२३ रोजी पहाटे तीन ते साडेतीन वाजता दरम्यान दाखल असून त्यातील एक वर्षांपासून फरार आरोपी नामे करण सिंग कल्याण सिंग राजपूत वय ३८ वर्ष राहणार सिडको कॉलनी प्लॉट नंबर ८६ सेक्टर जी तालुका हिंगणा जिल्हा नागपूर यास गुप्त बातमीदाराच्या माहितीवरून दिनांक १२/८/२०२४ रोजी सीडको येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आले तसेच त्याचा साथीदार नामे लावीत उर्फ आर्यन बादल खंजर वय ३३ वर्ष, रा. जलनगर खंजर मोहल्ला चंद्रपूर यास वर्धा येथून ताब्यात घेऊन दिनांक १५/८/२०२४ रोजी अटक करण्यात आली त्यांचे पी.सी.आर. दरम्यान यातील आरोपी क्रमांक १ याचे कडून गुन्हा करून पळून जाण्याकरिता वापरलेले मारुती सुझुकी कंपनीची गाडी क्रमांक एम.एच.- ४०/ सिए-२४०९ बलेनो किंमत दहा लाख रुपये व जबरीने हिसकावून नेलेले पैशांपैकी नगदी दहा हजार रुपये जप्त करण्यात आले तसेच आरोपी क्रमांक २ याने गुन्हा करून पळून जाण्यासाठी वापरलेले वाहन टोयोटा कंपनीचे फॉर्च्यूनर गाडी क्रमांक एम.एच. १७ एएस १११२ किंमत पंधरा लाख रुपये असा एकूण २५,१०,०००/- रू না मुद्देमाल दोन्ही आरोपीतांकडून जप्त करण्यात आला तसेच दिनांक १९/८/२०२४ रोजी त्यांचा पी.सी.आर. संपत असल्याने माननीय न्यायालय समक्ष एम.सी.आर. करिता हजर केले असता माननीय न्यायालयाने मध्यवर्ती कारागृह रवाना केले आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक रमेश धुमाळ, पोलीस उपअधीक्षक पूजा गायकवाड नागपूर विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक प्रतापराव भोसले, सपोनी सतीश मेश्राम, पीएसआय कुमोदिनी पाथोडे, पोहवा आशिष टेकाम, कुणाल पारधी, प्रवीण देव्हारे, तिलक रामटेके, पो.शी दशरथ घुगरे यांनी पार पाडली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

मनपाची टिल्लू पंप धारकांवर जप्तीची कारवाई

Thu Aug 22 , 2024
– नळाचे मीटर काढुन सुरु होता पाण्याचा वापर चंद्रपूर :- नळावरील मीटर काढुन पाण्याचा वापर करणाऱ्या व टिल्लु पंपद्वारे पाण्याचा गैरवापर करणाऱ्या ३ नळ जोडणीधारकांवर चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत जप्तीची कारवाई करण्यात आली असुन त्यांचे नळ कनेक्शन खंडीत करून दंड ठोठाविण्यात आला आहे.दंड न भरल्यास सदर नळजोडणी धारकांना काळ्या यादीत टाकल्या जाणार आहे. मनपातर्फे शहरातील सर्व नळ जोडणीवर जलमापक ( मीटर ) […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com