विविध ठिकाणी श्रीराम भक्तांनी फुलाच्या वर्षावाने केले भव्य स्वागत.
कन्हान : – शहरा पासुन ३ किमी अंतरावर असलेल्या टेकाडी गावातुन दरवर्षी प्रमाणे टेकाडी, गोंडेगाव ते जामसावळी श्री हनुमान पालखी पायी पदयात्रा श्री हनुमान मंदीर टेकाडी ला महाआरती व प्रसाद वितरण करून गाव भ्रमण करित टेकाडी येथुन जामसावळी पदयात्रेचे रस्त्यात विविध ठिकाणी श्रीराम व श्री हनुमान भक्तांनी फुला च्या वर्षाव, चाय व अल्पोहार वितरित करून भव्य स्वागत करून हर्षोल्लोहासात पदयात्रेचे जामसावळी करिता प्रस्थान करण्यात आले.
गुरूवार (दि.२४) फेब्रुवारी २०२२ ला श्री हनुमान मंदीर टेकाडी व ग्रामवासीया व्दारे टेकाडी, गोंडेगाव ते जामसावळी श्री हनुमान पालखी पदयात्रा श्रीराम व श्री हनुमान भक्तांनी आठव्या वर्षी टेकाडी येथील श्री हनुमान मंदिरात पालखी पदयात्रेचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव व श्री हनुमान मंदीर कमेटी अध्य क्ष पंढरीजी बाळबुधे यांच्या हस्ते पुजन, महाआरती व परिसरात प्रसाद वाटप करून पदयात्रा सुरूवात करि त गाव भ्रमण करून टेकाडी येथुन निघाली असता नागपुर, जबलपुर राष्ट्रीय महामार्गावर सावजी भोजना लय, जय दुर्गा मंगल कार्यालय येथे श्रीराम भक्तांनी फुलाच्या वर्षावाने स्वागत व अल्पोहार वितरित करून पदयात्रा कांद्री, तारसा रोड चौक, आंबेडकर चौक होत ब्रुक बाॅंड गेट कन्हान समोर आली असता श्रीराम व श्री हनुमान च्या जयघोषात पालखी पदयात्रेचे फुला च्या वर्षाव व अल्पोहार, चाय वितरण करून हर्षोल्लो हासात स्वागत करून पदयात्रेचे कामठी मार्गे जामसा वळी करिता प्रस्थान करण्यात आले. याप्रसंगी रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार प्रकाश भाऊ जाधव , पंढरी बाळबुधे, दिलीप राईकवार, मनोज लेकुळवाळे, किशोर पांजरे, उपसरपंच श्यामकुमार बर्वे, सचिन साळवी, नंदु लेकुळवाळे, कमलसिंह यादव, सतिश घारड, ॠषभ बावनकर, दादाराव राऊत, हरिश्चद्र हुड, प्रकाश तिमांडे, गौरव भोयर, आस्तिक चिंचुलकर, शिव नारायण आकोटकर, उमेश भोयर, नितीन ओमरे, अशोक राऊत सह प्रामुख्याने बहु संख्येने मान्यवर उपस्थित होते. टेकाडी ,गोंडेगाव ते जामसावळी तीन दिवसीय पालखी पदयात्रेच्या यशस्वितेकरिता नथुजी मोहाडे, गोपीचंद बुराडे, मनोज गुडधे, सुरेश खोरे, रविंद्र मोरे, राजु ़शेंदरे, कैलास राऊत, देवराव लेकुळ वाळे, वासुदेव नागोते, बदली प्रसाद, देवराव सातपैसे, टेकाडी सरपंचा सुनिता मेश्राम, अंजनी उमाळे, पारबती भेलावे, शकुंतला गाडगे, शशीकला राऊत, चंद्रकला आमले, प्रेमलता काठोके, मिराबाई राऊत, बेबीबाई राऊत, निर्मला हुड, मैनाबाई राऊत, कांताबाई नागपुरे, वनिता सातपैसे, कांताबाई नाकतोडे, माधुरी उमाळे सह समस्त टेकाडी , गोंडेगाव ग्रामवासी सहकार्य करित आहे.