एस.डी.ओ वंदना सवरंगपते तहसीलदार बाळासाहेब मस्के यांच्या उपस्थितीत संपन्न..
८३ फेरफार अर्ज कागदपत्रांची पुर्तता , निकाली …
दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी फेरफार अदालत चा लाभ घेण्याचे उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते यांचे आवाहन.
रामटेक :- जिल्हाधिकारी, नागपूर यांचे निर्देशान्वये महाराजस्व अभियान अंतर्गत आयोजित , फेरफार अदालत तहसिल कार्यालय, रामटेक येथील सभागृहामध्ये महा-ई-फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात आलेले होते. सदर फेरफार अदालतीमध्ये मंडळ अधिकारी /तलाठी उपस्थित झाले व त्यांनी त्यांचे स्तरावरील प्रलंबित ८३ फेरफार अर्ज कागदपत्रांची पुर्तता करुन निकाली काढण्यात आलेले आहेत. सदर अदालतीमध्ये नागरिकांचे नव्याने फेरफार अर्ज प्राप्त झाले असुन सदर फेरफार तलाठी यांचे मार्फत विहित कालावधीमध्ये निकाली काढण्यात येईल. सदर फेरफार अदालत उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते , तहसिलदार, बाळासाहेब म्हस्के, नायब तहसिलदार धात्रक , मंडळ अधिकारी कोडवते, जांगोळे, यांचे उपस्थितीमध्ये पार पडली. सदर फेरफार अदालतीस रामटेक तालुक्यातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला…
दर महिन्याच्या पहिल्या बुधवारी लागणाऱ्या आवश्यक कागद पत्रा सह फेरफार अदालत चा लाभ घेण्याचे आवाहन उपवभगिय अधिकारी वंदना सवरंगपते यांनी केले.
जेवढी प्रलंबित फेरफार होती तसेच या अदालत मध्ये ज्यांनी अर्ज दीले यांचे फेरफार निकाली काढण्यात आले.ज्यांना कुणाला अजून प्रॉब्लेम आहे त्यानी पुढच्या महिन्यात बुधवारी मंडळ अधिकारी यांचे मार्फत आपली समस्या मार्गी काढावी असे आवाहन तहसीलदार बाळासाहेब मस्के यांनी केले…