मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजनेची तांत्रिक पडताळणी सुरू,  पात्र महिलांच्या बँक खात्यात एक रुपयाच जमा होईल  अशा अफवांवर विश्वास ठेवू नये  – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई :- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेला ‘ राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी तांत्रिक पडताळणी सुरू करण्यात आली आहे. या तांत्रिक पडताळणीसाठी काही पात्र महिलेच्या बँक खात्यात एक रुपया जमा होईल. जमा होणारा हा एक रुपया लाभार्थ्यांचा सन्मान निधीचा लाभ नाही तर तांत्रिक पडताळणीचा एक भाग आहे. असे सांगून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.

मंत्री तटकरे म्हणाल्या की, “या योजनेद्वारे अर्ज सादर केलेल्या निवडक पात्र महिला अर्जदारांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत या संपूर्ण प्रक्रियेची तांत्रिक पडताळणी करण्यात येत आहे. त्यासाठी प्रायोगिक तत्वावर काही निवडक महिलांच्या बँक खात्यात प्रत्येकी एक रुपया जमा करण्यात येत आहे.

ही पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू करण्यासाठी निश्चितपणे मदत होणार आहे. हा एक तांत्रिक प्रक्रियेचा भाग असून याबद्दल कुठलाही प्रक्रियेचा गैरसमज किंवा कोणत्याही अपप्रचाराला बळी पडू नका “असेही मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना विधान भवनात आदरांजली

Fri Aug 2 , 2024
मुंबई :- लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त महाराष्ट्र विधानमडळ सचिवालयाचे सचिव (1) (कार्यभार) जितेंद्र भोळे यांनी विधान भवनातील त्यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन आदरांजली वाहिली. यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिव (2) (कार्यभार) विलास आठवले, उपसचिव राजेश तारवी, अवर सचिव विजय कोमटवार, मोहन काकड व महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे मुख्य सुरक्षा अधिकारी प्रदीप चव्हाण यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!