युवा चेतना मंच तर्फे शिक्षक दिवस साजरा..

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी 

कामठी ता प्र 5 – स्वामी विवेकानंद वाचनालय रनाळा येथे युवा चेतना मंच तर्फे शिक्षक दिवस साजरा करण्यात आला . याप्रसंगी कामठी निधी अर्बन बँकचे डायरेक्टर नितीनजी ठाकरे, दिव्यांग संस्थाचे अध्यक्ष बॉबी महेंद्र प्रामुख्याने उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. डॉ पराग सपाटे व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्रीकांत अमृतकर यांचे शिक्षक दिनाच्या औचित्याने सत्कार करण्यात आले . याप्रसंगी प्रा. डॉ पराग सपाटे यांनी शिक्षकाची भूमिका व श्रीकांतजी अमृतकर यांनी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनावर प्रकाश टाकले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन अमोलजी नागपुरे यांनी केले तर आभार प्रदर्शन अक्षय खोपे यांनी केले . याप्रसंगी गोपाल राव वंजारी, नरेश सोरते , सुभाष हिवरेकर , प्रामुख्याने उपस्थित होते

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

Next Post

शिक्षक दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री यांनी ऑनलाइन साधला संवाद.

Tue Sep 6 , 2022
अमरदिप बडगे,प्रतिनिधी गोंदिया येथील शिक्षणाधिकारी यांचा हि सहभाग गोंदिया :- डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवस संपूर्ण भारतात शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याचेच औचित्य साधून आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात शिक्षण अधिकारी सह शिक्षकांसह व्हिडिओ कॉन्फर्सद्वारे संवाद साधला. यावेळी गोंदिया जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये जिल्हा मधील 8 प्राथमिक आणि 2 माध्यमिक विभागातील आदर्श शिक्षक पुरस्कार […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com