मालमत्ता धारकांना करात सवलत जाहीर

– सुटीच्या दिवशीही भरता येणार कर

चंद्रपूर :- चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत मालमत्ता कराचा एकरकमी भरणा करणाऱ्या नागरिकांना करात सवलत देण्यात येत असुन ३० सप्टेंबर २०२४ पर्यंत थकबाकीसह मालमत्ता कराचा एकमुस्त भरणा ऑफलाईन पद्धतीने केल्यास ८ टक्के तर ऑनलाईन पद्धतीने भरणा केल्यास १० टक्के सुट देण्यात येत आहे. तसेच कर भरणा करणे सुविधेचे व्हावे या दृष्टीने ३० सप्टेंबर पर्यंत येणाऱ्या प्रत्येक सुटीच्या दिवशी मालमत्ता कर भरणा कार्यालय सुरु राहणार आहे.

महापालिका क्षेत्रात ८० हजाराहुन अधिक मालमत्ता असून, संपूर्ण मालमत्तांच्या माध्यमातून दरवर्षी मागणी नोंदवली जाते. करदात्यांना कराची नोटीस पाठवून कर भरणा करण्यासाठी विनंती करण्यात येते. कर न भरल्यास दंड वसुली तसेच प्रसंगी मालमत्ता सील करण्याची कारवाई करण्यात येते. जास्तीत जास्त वसुली होऊन ती शहराच्या विकास कामांसाठी उपयोगी यावी या अनुषंगाने यंत्रणा जोमात कामाला लागली आहे.

चंद्रपूर महानगरपालिकेचे स्वतःचे उत्पन्न वाढुन कर्मचाऱ्यांचे वेतन व इतर किरकोळ खर्च पालिकेला स्वतःच्या उत्पन्नातून भागविण्याचे दृष्टीने मालमत्ता कराची वसुली नियमित व प्रभावी होण्याकरीता मनपाद्वारे विविध प्रयत्न केले जातात. मालमत्ता कराच्या प्रभावी वसुलीकरीता व संभाव्य उद्दिष्ट पूर्ती करीता मनपातर्फे करात सवलत जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाईन पद्धतीने कराचा भरणा करणाऱ्या नागरिकांना पुढील आर्थिक वर्षात विशेष सवलत दिली जाणार आहे त्यामुळे या कर सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेचा द्वितीय क्रमांकाने गौरव

Mon Sep 23 , 2024
– तालुकास्तरावर २ लक्ष रुपयांचे बक्षीस – मुख्यमंत्री स्वच्छ शाळा सुंदर शाळा स्पर्धा चंद्रपूर :- भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान स्पर्धेत पी एम श्री सावित्रीबाई फुले मनपा शाळेस तालुक्यातुन द्वितीय क्रमांकाचे बक्षीस याअंतर्गत २ लक्ष रुपयांचा धनादेश शाळेस प्राप्त होणार आहे. भारतरत्न डॅा. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com