हे घ्या धक्कादायक राजकीय स्फोट आणि गौप्यस्फोट

पुन्हा एकवार सांगतो कि थंड डोक्याने खून करीत सुटलेल्या माथेफिरूंपेक्षा देखील महा खतरनाक एकमेव शरद पवार, त्यांचे एकमेव दुर्दैव कि ते ज्याला आधी मोठे करतात एकतर ते स्वतःच त्याचा राजकीय खात्मा करून मोकळे होतात किंवा ज्या अनेकांना शरद पवारांनी मोठे केले तेच त्यांना सोडून जातात पण हे क्वचित घडते याउलट जे आपणहून शरद पवारांना सोडून जातात बहुतेकवेळा तुम्ही बाहेर पडा आणि अमुक पक्षात प्रवेश करा किंवा तमुक ठिकाणाहून निवडणूक लढवा हे स्वतः शरद पवारांनीच पवारांना सोडून जाणार्या किंवा त्यांचा पक्ष सोडणाऱ्यांना सांगितलेले असते ज्याचा अनुभव तुम्हाला केवळ पुढल्या काही दिवसात जर नक्की आला नाही किंबहुना ती सुरुवात आधीच झालेली आहे थोडक्यात हे घडले नाही तर मी भर चौकात थेट नागडा होऊन अगदी उघड्यावर तांडव नृत्य करून मोकळा होईल. जे विविध अनेक धक्के पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी महाआघाडीला हाताशी धरून वापरून राज्यातल्या महायुतीला दिले त्यापेक्षा कितीतरी अधिक पटींनी हेच पवार अनेक महाधक्के अगदी शंभर टक्के महायुतीला आधी देतील नंतर निवडणुकीत त्यांच्या नक्की नाकात दम आणतील ज्याची स्पष्ट कल्पना याआधीच फडणवीसांनी मोदी आणि शहा याना दिलेली असल्याने जसे बायको माहेरी गेली कि चावट पुरुष बसता उठता प्रेयसीच्या घरी पळतात तसे यादिवसात मोदी आणि शाह यांचे झाले आहे ते वारंवार महाराष्ट्रात येताहेत आणि पूर्णतः महायुती महाआघाडी आणि शरद पवार तिघांवरही लक्ष ठेवून आहेत पण शरद पवार म्हणजे परीक्षेत कॉपी करणारा लबाड आणि तरबेज विद्यार्थी जो कधीही शिक्षकांच्या नजरेत पडत नाही, शरदरावांचे खतरनाक राजकीय डावपेच यादिवसात थेट पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या देखील नजरेस न पडणारे म्हणून ते अस्वस्थ आहेत…

अजितदादांच्या संगे बाहेर पडलेले बहुतेक सारेच पुढल्या काही दिवसात पुन्हा एकवार काकांच्या मांडीवर जाऊन बसतील किंवा बसताहेत हे तुम्हाला सांगणे म्हणजे एखाद्या नटीची प्रेमप्रकरणे तिच्या नवऱ्याला सांगण्यासारखी. शरद पवारांचा टाकलेला एक खतरनाक डाव तर अनेकांना विशेषतः अजित पवार किंवा भाजपाला अस्वस्थ करणारा म्हणजे शरद पवारांना मंत्री असलेल्या धर्मराव बाबा आत्राम यास त्याची जागा दाखवायची असावी त्यातून त्यांनी थेट धर्मराव विरोधात त्यांच्या मुलीला प्रचंड राजकीय आर्थिक ताकद देत भाग्यश्रीला बापाविरोधात विधानसभा लढविण्यास सांगितले आहे, निवडणूक प्रचारात हीच भाग्यश्री वडिलांचे आर्थिक गैरव्यवहार आणि बायकांची लफडी पुराव्यांसहित जाहीर करणार असल्याचे कानावर येते आहे. तिकडे बुलढाण्यातून अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे वास्तविक पुन्हा शारदरावांकडे परतण्या प्रचंड उत्सुक असले तरी तेथेच थांबा आणि फक्त गम्मत बघा, पवारांनी त्यांना सांगितले आहे वरून त्यांच्या कन्येस गायत्री शिंगणे यांना त्यांनी आपल्या राष्ट्रवादीतून निवडणूक लढविण्यास सांगितले आहे. यादिवसात दररोज एक मोठा धक्का हे तंत्र पवारांनी अवलंबिले असल्याने त्यातून जसे भाजपा महायुतीला काही प्रमाणात सुचेनासे झाले आहे त्याचपद्धतीने स्वतः उद्धव ठाकरे आणि अजित पवार देखील मनातून का व कसे अस्वस्थ आहेत त्यावर देखील नेमकी माहिती मी लवकरच उघड करणार आहे. थोडीशी हिंट येथे देतो ती अशी कि तुम्हाला आठवत असेल कि सुरुवातीला भाजपा श्रेष्ठींनी रा स्व संघाच्या जशा विविध अनेक फांद्या आहेत त्यातलीच एक फांदी शिवसेना यापुढे असेल म्हणजे शिंदे शिवसेना हि भाजपाचीच एक फांदी एक ब्रांच असेल पण वेगळा पक्ष अशी त्याची प्रतिमा उभी करत पुढले राजकारण एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून खेळायचे भाजपाने ठरविले होते पण घडले भलतेच कारण सुरुवातीला त्यांना कमालीचे साधे सरळ आज्ञाधारक पण आक्रमक वाटणारे एकनाथ शिंदे यांनी जेव्हा फडणवीसांच्या ऐवजी मुख्यमंत्री केले त्यानंतर भाजपचे सारेच प्रयोग आज जवळपास फसले आहेत कारण एरवी बावळट दिसणारे शिंदे राज्यात भाजपाच्या पुढे निघून गेल्याचे आज चित्र दिसते आहे पण यापुढे विशेषतः ते विधानसभा निवडणुकीनंतर पुन्हा महायुतीला धरून राहतील त्यावर भाजपा नेत्यांना शंका वाटते आहे…

पुन्हा तेच सांगतो कि फडणवीसांचे महत्व संपवायचे त्यांच्या नेत्यांनी जे विनाकारण प्रयत्न केले आज तेच त्यांच्या अंगलट आल्यासारखे झाले आहे किंबहुना उद्या ज्या अजित पवार यांना भाजपाने नव राजकीय आयुष्य आणि जीवनदान दिले उद्या जर हेच अजित पवार पुन्हा एकवार काकांच्या मांडीवर जाऊन बसले तर त्यात अजिबात आश्चर्य वाटून घेऊ नका कारण त्यावर देखील शरद पवार कोणत्याही क्षणी गौप्यस्फोट करून भाजपाला मोठा धक्का देतील. राज्यातल्या भाजपाला चारी बाजूंनी अडचणीत आणण्यात अर्थात फक्त आणि फक्त शरद पवार पुढाकार घेतात आणि इतर घटक पक्ष लगेच माना डोलावतात. तिकडे रायगड जिल्ह्यात देखील फारशी वेगळी परिस्थिती नाही कारण अजितदादांपेक्षा शरद पवारांना का कोण जाणे पण सुनील तटकरे यांच्याविषयी यादिवसात प्रचंड राग आणि घृणा असल्याने त्यांनी तिकडे पुन्हा एकवार सुनील यांचे बंधू अनिल आणि पुतण्या अवधूत यास एखाद्या प्रेयसीसारखे यादिवसात अगदी घट्ट बिलगून जवळ घेतले आहे. राज्यात कुठेही जा, शरद पवार यांनी जेथे भाजप महायुती बलवान तिथे तिथे त्यांच्या डोक्यात मोठा राजकीय दगड घालायला सुरुवात केलेली आहे. अत्यंत महत्वाचे असे कि भाजपाने एकतर एकनाथ शिंदे यांच्यावर अधिक कडक अटी लादून त्यांना महायुतीमध्ये असू द्यावे आणि निवडणुकांआधीच अजित पवारांना बाहेर काढावे किंवा थेट एकट्याने भाजपाने राज्यात विधानसभा लढवावी, माझा ताजा रिपोर्ट असा कि केवळ पश्चिम विदर्भात जर भाजपा स्वतंत्र निवडणूक लढली तर 30 पैकी किमान 15 जागांवर त्यांचा विजय निश्चित आहे. चारीबाजूंनी भाजपाला पवारांनी कोंडीत पकडले आहे त्यांनी या निवडणुका स्वतंत्र लढाव्यात त्यातच त्यांचे मोठे हीत आहे…

अपूर्ण : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

आज तलाठी काढणार ग्रामपंचायत येसंबा येथील अतिक्रमण

Thu Oct 3 , 2024
कोदामेंढी :- दिनांक २५/९/२०२४ लां मौदा पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या ग्रामपंचायत येसंबा तर्फे २५१५ अंतर्गत भूमिगत नालीचा शासकीय कामाला शासकीय जागेवर अतिक्रमण करणारे गावातीलच परसराम शेंडे व त्यांची पत्नी विरोध करत असल्यामुळे सरपंचा सोनू इरपाते, उपसरपंच धनराज हारोडे , ग्रामपंचायत सदस्य देवानंद गजभिये, सदस्या करिश्मा पानतावणे, सदस्या वर्षा महल्ले यांनी मौदा तहसिदार धनंजय देशमुख यांना निवेदन दिले. याबाबत तहसीलदारांनी […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com