न्या. नितीन सांबरे नवे प्रशासकीय न्यायाधीश

नागपूर :- मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठासाठी नवीन वरिष्ठ प्रशासकीय न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती नितीन सांबरे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी गुरुवारी (ता.१०) ही नियुक्ती केली.

न्यायमूर्ती नितीन सांबरे हे नागपूर खंडपीठात न्यायमूर्ती अतुल चांदुरकर यांच्या जागी रुजू होती. न्यायमूर्ती अतुल चांदुरकर सेवा ज्येष्ठतेच्या आधारावर मुंबई येथे रूजू होणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे नवनियुक्त प्रशासकीय न्यायाधीश न्यायमूर्ती नितीन सांबरे मुळचे नागपूरचे आहेत. त्यांनी सोमलवार हायस्कूल, शिवाजी विज्ञान महाविद्यालयात शालेय व महाविद्यालयीन शिक्षण घेतले. शहरातील विधी महाविद्यालयातून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले.

2014 मध्ये न्यायाधीश म्हणून पदोन्नती होण्यापूर्वी त्यांनी दीर्घकाळ नागपूर खंडपीठात सरकारी वकील म्हणून काम केले. तत्कालीन ज्येष्ठ वकील आणि सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान न्यायमूर्ती श्री. शरद बोबडे यांचे सोबतच त्यांनी कायदेशीर कार्याची सुरूवात केली. दिवाणी, रिट आणि फौजदारी खटल्यांवर त्यांनी मुंबई, नागपूर उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

Maharashtra's progress in the world of sports through the visionary policy of Sports Minister Sanjay Bansode

Fri Nov 10 , 2023
– Memorable performance record in 37th National Games Goa :- Enthusiastic Sports Minister Sanjay Bansode has given Maharashtra’s sports world a new identity at the national level in a short span of time. He has promoted the quality of talented players at the grassroots level through financial and technical support. Due to this initiative, the young sportspersons of the state […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!