न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी घेतली मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

मुंबई :- अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली.

राजभवन येथे शनिवारी (दि. २९ जुलै) झालेल्या एका छोटेखानी शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी न्या. उपाध्याय यांना पदाची शपथ दिली. 

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, न्या. उपाध्याय यांचे कुटुंबिय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.

सुरुवातीला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्या. उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा जन्म दिनांक १६ जून १९६५ रोजी झाला. न्या. उपाध्याय यांनी १९९१ मध्ये लखनौ विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आणि ११ मे १९९१ रोजी वकील म्हणून नोंदणी केली. त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठात नागरी आणि घटनात्मक बाजूने कामकाज पहिले. दिनांक २१ नोव्हेंबर २०११ रोजी त्यांना अतिरिक्त न्यायाधीश पदावर बढती मिळाली आणि ६ ऑगस्ट २०१३ रोजी त्यांची न्यायाधीश पदावर नियुक्ती करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

बारूद मजदूरों की सुरक्षा खतरे में - स्वप्नील वानखेडे

Sun Jul 30 , 2023
– न्यूनतम वेतन भी नहीं, शोषण जारी, सरकार बेखबर, उदासीन ! नागपुर :- एक तरफ, मौसम की मार तो दूसरी तरफ विपरीत परिस्थिति और बिना सुरक्षा मानकों के बारूद फैक्ट्री में अपनी जान हथेली पर रखकर काम करने वाले मजदूरों की परेशानियों पर किसी की नजर नहीं जाती, जबकि यह मजदूर अपनी जान हथेली पर रखकर यहां की फैक्ट्रियों में […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com
error: Content is protected !!