महिलांचा अवमान करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांवर कारवाई करा – भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

मुंबई :- महिलांबद्दल बेताल, अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि छत्रपतींच्या गादीचा कायमच अपमान करणाऱ्या काँग्रेस आणि महविकास आघाडीच्या नेत्यांवर निवडणूक आयोगाने कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केली आहे.

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजे छत्रपती यांनी उमेदवारी मागे घेतल्यानंतर काँग्रेसचे आमदार व माजी मंत्री सतेज पाटील यांनी त्यांना उद्देशून काढलेल्या उद्गारातून काँग्रेस नेत्यांची बोलण्याची, विचार करण्याची विकृत मानसिकता दिसून येते. छिंदवाडा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण असो की विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची घटना, काँग्रेसने कायम छत्रपतींच्या गादीचा अपमान करण्याचेच काम केल्याची टीका उपाध्ये यांनी केली.

उबाठा चे संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपतींच्या गादीचा वारस असण्याबद्दल पुरावा मागत राज्यातील तमाम शिवप्रेमी जनतेच्या भावना दुखावल्या होत्या. अरविंद सावंत यांनीही शायना एन. सी. यांच्याबद्दल अनुद्गार काढल्याने केवळ महिलांचीच नव्हे तर समस्त जनतेची मान खाली गेली आहे. एकीकडे महिला अत्याचाराबद्दल आवाज उठवायचा, दुसरीकडे असे वागायचे, या सगळ्यातून काँग्रेसचा दुटप्पीपणा दिसतो. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या नेत्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई व्हावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे करत असल्याचे उपाध्ये यांनी यावेळी सांगितले.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

३० नोव्हेंबर पुर्वी सादर करावा हयातीचा दाखला

Wed Nov 6 , 2024
– सेवानिवृत्त कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांना मनपाचे आवाहन चंद्रपूर :- चंद्रपूर महानगरपालिकेतील सर्व सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी व कुटुंबनिवृत्तीधारक यांनी त्यांच्या हयातीचा दाखला ३० नोव्हेंबरपुर्वी मनपा लेखा विभागात सादर करण्याचे आवाहन चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येत आहे.https://newstoday24x7.com/wp-content/uploads/2024/10/WhatsApp-Video-2024-10-30-at-14.56.12_caaf8c51.mp4 हयातीचा दाखला हा भारतीय स्टेट बँक चंद्रपूर येथील मुख्य शाखेतुन प्रमाणित केलेला असावा तसेच हयातीचा दाखल स्वप्रमाणीत करून त्यावर त्यांचा मोबाईल क्रमांक नमुद असणे आवश्यक […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com