नागपूर :- स्वर शिल्प तर्फे ‘गीतों का सफरनामा’ (essence of background harmony) या निवडक श्रवणीय गीतांचा कार्यक्रमाचे शनिवार २९ जुलै रोजी लक्ष्मीनगर चौकातील सायंटिफीक सभागृहामध्ये सायंकाळी ६.३० वाजता आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमाची संकल्पना भाग्यश्री बारस्कर यांची असून निवेदन सुप्रसिद्ध निवेदिका श्वेता शेलगावकर यांचे असणार आहे.
‘गीतों का सफरनामा’ (essence of background harmony) या कार्यक्रमाची संकल्पना अनोखी आहे. चित्रपटांमध्ये अभिनेता व अभिनेत्रींनी गाण्याचे बोल म्हणण्याऐवजी आपल्या अभिनयाच्या जोरावर गीतांची संवेदना प्रेक्षकांपर्यंत पोहचविली. असेच निवडक गीत या कार्यक्रमामध्ये संगीत कलाकारांकडून साजरी केली जाणार आहे. कार्यक्रमात नंदू गोहणे, परीमल जोशी, रितेश त्रिवेदी व प्रशांत नागमोते यांची साथसंगत असेल.
कार्यक्रमामध्ये देवयानी जोशी, पल्लवी उपदेव, शिवांगी बुटी, डॉ. मेघना जोशी, मनिषा सावरकर, विद्या काणे, नंदिनी पाटणकर, डॉ. मंजिरी ठाकूर, मंजुषा जोशी, डॉ. नीता भावे, रेणूका वेलणकर, तन्मया मुंडले, अनिंदिता चॅटर्जी, सरिता पंडित आणि व्यंकटेश बुटी आदी कलावंत गीतांचे सादरीकरण करणार आहेत. कार्यक्रम नि:शुल्क असून जास्तीत जास्त नागरिकांनी या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा असे आवाहन, आयोजकांद्वारे करण्यात येत आहे.