नागपूर : संत गाडगेबाबा जयंती निमित्त गुरूवारी (ता. २३) स्वच्छ भारत अभियानात स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मनपा शाळेत स्वच्छता दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या निर्देशानुसार संपूर्ण शहरात विविध शासकीय कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्रांमधून स्वच्छता दिंडी काढण्यात येणार आहे.
मनपा अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालय, शाळा, आरोग्य केंद्रात संत गाडगे बाबा जयंती साजरी करण्यात येणार आहे. शहरातील जी. एम. बनातवाला माध्यमिक शाळा येथे सकाळी ७. ३० वाजता स्वच्छता दिंडी काढण्यात येणार आहे. त्यापाठोपाठ वाल्मिकीनगर माध्यमिक शाळेत सकाळी १०.३०, एम. ए. के. आझाद उर्दू माध्यमिक शाळेत सकाळी ११.३०, लालबहादूरशास्त्री हिंदी माध्यमिक शाळेत दुपारी १२.३० आणि दुर्गानगर माध्यमिक शाळेत दुपारी १.३० वाजता स्वच्छता दिंडी काढण्यात येणार आहे.
संत गाडगेबाबा जयंती निमित्त नागपूर महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालय, शाळा, लहान-मोठे दवाखाने यांनी स्वच्छता मोहिम राबवून कार्यालयातील अधिकारी / कर्मचारी यांचा सहभाग घेवून दिंडी काढण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहे.
@ फाईल फोटो