नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.26) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रितेश गृह उदयोग, हुडकेश्वर नागपूर यांच्यावर दुकानाचा कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रेली पथॉलॉजी लॅब, रामना मुर्ती रोड, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. संदीप किराणा शॉप, गांधीबाग, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केले. तसेच मे. गुरु मोबाईलस, इतवारी, नागपूर यांच्यावर अवैद्य वृक्ष तोड केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जय दुर्गा किराणा शॉप, पंचवटी नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रेणुका इंफ्रा. एल.एल.पी, गोरेवाडा, रिंग रोड, नागपूर यांच्यावर बांधकामाचे साहित्य रस्त्यावर पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच मे. हॉटल बरतानीया, मेकोसाबाग, नागपूर यांच्यावर चेंबर ब्लॉक केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आले. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.