स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई  

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.21) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 35 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. द काकोरी अ युनिट ऑफ अंवत गर्दे सिव्हिल लाईन, नागपूर यांच्यावर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. संत रवीदास सांस्कृतीक सभागृह, बुधवार बाजार, नागपूर यांच्यावर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. धांडे डेअरी, खरबी चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मे. टेक्सेस स्पाईस नुडल्स शॉप, खरबी चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यावर कचरा टाकल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मे. मनोहर सावजी भोजनालय, गुरुदेव नगर, नंदनवन, नागपूर यांच्यावर चेंबर ब्लॉक केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

सतरंजीपूरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. केशरकर किराणा शॉप, राणी दुर्गावती चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मोरेश्वर राहाटे, कळमना मार्केट, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

पीएम स्वनिधी योजने अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँकांना गौरवपत्र 

Fri Sep 22 , 2023
– ५०२० पथविक्रेत्यांनी घेतला रुपये १० हजार कर्जाचा लाभ    चंद्रपूर :- प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजना ( पीएम स्वनिधी योजना) अंतर्गत चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत दिल्या जाणाऱ्या १० हजार रुपये कर्जाचा लाभ आतापर्यंत ५०२० पथविक्रेत्यांनी घेतला असुन योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक कर्ज प्रकरणे मंजुर करणाऱ्या विविध बँकांना गौरवपत्र देऊन आयुक्त विपीन पालीवाल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पीएम स्वनिधी योजनेत सर्व बँकेकडे […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com