स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने मंगळवार (ता.29) 07 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विकार तारेकर, पांडे लेआऊट, नागपूर यांच्यावर चेंबरला ब्लॉकेज केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. नाईनटीस कॅफे, शंकर नगर चौक, नागपूर डिसल्टिंग चेंबर आणि ड्रेनेज चेंबरच्या ब्लॉकेजची उपलब्धता नसल्याबद्दल कारवाई करून 15 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. मे. सब अर्बन लॅब, गोकुलपेठ मार्केट, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला.

मे शिव प्लेसिंग आर्चेरी अकॅडमी, गोकुलपेठ मार्केट, नागपूर मनपाच्या मालमत्तेवर पॉम्पलेट/पत्रक चिकटवले/लटकविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. चिन्मय चिल्ड्रन अँड सर्जिकल हॉस्पीटल, गोकुलपेठ मार्केट, नागपूर यांच्यावर जैव वैद्यकीय कचरा सामान्य कचऱ्यासोबत आढळून आल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. तुलसी डेयरी, हुडकेश्वर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मित्रो रेस्टॉरेंट, न्यु नंदनवन, नागपूर यांच्यावर किचन वेस्ट वॉटर लाइन चेंबरशी जोडलेली आहे आणि कचरा फी न भरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त "डॉन टु डस्क" हॉकी स्पर्धा

Wed Aug 30 , 2023
– खेलरत्न मेजर ध्यानचंद यांना विनम्र अभिवादन नागपूर :- हॉकीचे जादूगार खेलरत्न मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून नागपूर महानगरपालिका क्रीडा विभाग व परशुराम सर्व भाषिय ब्राह्मण संघ यांच्या वतीने १७ वर्षांखालील शालेय मुली व मुले यांची सहा सदसीय संघ असणारी ” डॉन टु डस्क” ही हॉकी स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उद्घाटन व्हीएचएचे माजी अध्यक्ष बी. सी. […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com