स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.24) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. जी.बी. हॉस्पीटल, हिल रोड, गांधी नगर, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव कचरा आढळून आल्याबद्दल कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्रकाश कोल्हे, हुडकेश्वर, नागपूर व प्रभावती सिंगर, मानेवाडा, नागपूर यांच्यावर रस्त्याच्या कडेला असलेले मोठे आणि हिरवे झाड कापून त्यांच्या फांद्या आणि पाने रस्त्याच्या कडेला पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अल्ट्रा इन्फ्रा, नरेन्द्र नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अदित्य भोजनालय, नंदनवन, नागपूर यांच्यावर हरित न्यायाधिकरण कायद्यांतर्गत जेवणाचा अपव्यय टाकून जवळच्या चेंबरला ब्लॉक केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गुरुनानक किराणा शॉप, गांधीबाग, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ओमको इंटरप्राईजेस, न्यु कॉलोनी, सदर, नागपूर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

श्री राधा कृष्ण ने किया नौका से यमुना भ्रमण

Fri Aug 25 , 2023
– आज श्री राधाकृष्ण मंदिर में श्रीनाथजी का बंगला की झांकी होगी प्रस्तुत नागपुर :- श्री राधाकृष्ण मंदिर, वर्धमान नगर में जारी सावन झूलोत्सव में झांकी दर्शनार्थ श्रद्धालुओं की भीड़ उमड़ रही है। गुरुवार को यमुनाजी में भगवान श्री राधाकृष्ण के श्रीविग्रह का भ्रमण की सुन्दर झांकी प्रस्तुत की गई | विशाल टैंक में यमुनाजी साकार लग रही थी। मोरपंख […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com