नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार (ता.18) 4 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 30 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. पार्क व्हिव-II जिवन छाया नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. न्यु लक्ष्मी स्विटस, नाईक तलाव, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगलवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रंगोली एझिबीशन, छावनी, नागपूर व मे. विस्युअल अकॅडमी, बेझनबाग, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत प्रत्येकी 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.