स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.24) 08 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 45 हजार रुपयांचा दंड वसूल केला. लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. फॉर्टुना कॅपिटल, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. ए.डी.बी. अकाऊटीग एकॅडमी, रविनगर चौक, नागपूर व मे. गायकवाड कोचींग क्लासेस, धंतोली, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अभ्याकस सेंटर, न्यु सुभेदार लेआऊट, नागपूर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच स्वाती उपाध्यय, नंदीनी नगर, नरसाळा, नागपूर यांच्यावर बांधकाम साहित्यचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरविल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. धार्मिक किराणा स्टोर्स, इतवारी नागपूर तसेच मे. राज किराणा स्टोर्स, टेलिफोन एक्सचेंज चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. क्रिष्णा स्विटस, बिनाकी, मंगलवारी, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 कार्यान्वित करण्‍यात वर्ध्याचे महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विद्यापीठ अग्रेसर - कुलगुरू प्रा . शुक्‍ल यांचे प्रतिपादन

Tue Jul 25 , 2023
नागपूर/वर्धा :- महात्‍मा गांधी आंतरराष्‍ट्रीय हिंदी विद्यापीठाने केंद्र शासनाच्या ‘राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरण:2020 लागू करण्‍यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करुन धोरण कार्यान्वित करणे सुनिश्चित केले आहे. हिंदी विद्यापीठाने एकेडमिक बँक क्रेडिट, बहु प्रवेश व निकास, अंतरानुशासनिक अध्ययन कार्यक्रम, राष्‍ट्रीय एकेडमिक डिपोजिटरी, ‘स्‍वयम’ वर संचालित कार्यक्रमांचे क्रेडिट स्‍थानांतरण, भारतीय भाषांमध्‍ये अध्ययन, राष्‍ट्रीय शैक्षणिक धोरणावर ऑनलाइन व ऑफलाइन कार्यक्रमांचे आयोजन, पुस्तक प्रकाशन, डॉ. आंबेडकर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com