नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने गुरुवार (ता.20) 12 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 75 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. दि विद्यार्थी अकॅडमी ऑफ कॉमर्स, आकार नगर, काटोल रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. माधव पॅथलॉजी, धरमपेठ, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह काचेचे तुटलेले तुकडे टाकल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. गोकुल मधुशाला बार, हुडकेश्वर, नागपूर यांच्यावर बारचा कचरा रस्त्याच्या कडेला पसरला आहे आणि कचरा शुल्क भरले नसल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. एस.आर. कंन्स्ट्रक्शन, बैद्यनाथ चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. खान बिल्डर्स, म्हाळगी नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मे. पोदृार जंबो किडस स्कुल, साईबाबा नगर, खरबी, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून प्रत्येकी 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच अरुन नालने, तिरंगा चौक, आनंद नगर, नागपूर यांच्यावर झाडे तोडणे आणि रस्त्यालगतच्या फांद्या पसरल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. नागपूर ग्लास कंपनी, गंगाबाई घाट रोड, नागपूर यांच्यावर काचेचे मोठे तुकडे टाकून चेंबरचा अडथळा केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. केशव स्विटस, ठक्करग्राम, पाचपावली, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. मयुर अग्रवाल, सुर्या नगर, नागपूर यांच्यावर टाकाऊ बांधकाम साहित्य टाकून चेंबरचा अडथळा केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. स्टार हॉल, कोराडी रोड, नागपूर यांच्यावर परवानगीशिवाय पुलाच्या भिंतीवर बॅनर लावल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. तसेच ब्रिजेश पांडे, गोरेवाडा रिंग रोड, नागपूर यांच्यावर परवानगीशिवाय केबल जोडण्यासाठी सर्व्हिस रोड तोडल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.