नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.9) 5 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 25 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मेडिफाई किड़स, मानव सेवा नगर सेमिनरी हिल्स, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे हॉटेल अशोका इंपॅरेअल, रेल्वे क्रॉसींग मनिष नगर, नागपूर यांच्यावर ओला आणि सुका कचरा वेगळा न केल्याने अस्वच्छ स्वयंपाकघर आढळल्याने यांच्यावर 5 हजार दंड वसूल करण्यात आला.
गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे त्रम्बेक रामटेकेकर, गंगावती निवास, नाईक रोड, महाल यांच्यावर मोकळ्या प्लॉटमध्ये बोअरवेल खोदून जवळपासच्या परिसरात चिखल आणि पाणी पसरल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत पाहुने क्लॉथ स्टोर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोन अंतर्गत गिरी डिस्पोसल या दुकानावर सुध्दा प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.