नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सोमवार (ता.17) 15 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 90 हजार रुपयांचा दंड वसूल केला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे विवेक कुनावार, रामनगर नागपूर यांच्यावर सी आणि डी कचरा चेंबरवर टाकल्याबद्दल आणि नुकसान केल्याबद्दल कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत मे. इरा किड़स, गर्व्हमेंट सोसायटी, दाभा, नागपूर यांच्यावर 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला व मे. दिनेश डेकोरेर्टस, दाभा, नागपूर यांच्यावर 10 हजार दंड वसूल करण्यात आला. हनुमान नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. व्ही-4 बार ॲण्ड रेस्टॉरेंट, म्हाळगी नगर हुडकेश्वर, नागपूर यांच्यावर कचरा न भरणेबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला व मे. सक्सेस स्टडी सर्कल, हुडकेश्वर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.नेहरु नगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे कॅलिबर टयुशन क्लासेस, नंदनवन, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत कारवाई करून 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अजय स्विटस व वसंत स्विटस, टिमकी, मोमिनपुरा, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे आदर्श स्विटस, बाबा राम सुमेर नगर, नागपूर व राजेश स्विटस, जैन मंदिर, शांती नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. संतकृपा निवास-1 व मे. संतकृपा निवास-2, सीएमपीडीआय रोड, जरीपटका, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच मे. पंकज कंन्स्ट्रक्शन, गिट़टीखदान चौक, मे. व्हाईट किंग मार्बल, गोरेवाडा रिंग रोड, व मे. इकरा इंटरनॅशनल स्कुल, मंगलवारी मार्केट सदर, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई
Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com