स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने बुधवार (ता.05) 7 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 55 हजार रुपयांचा दंड वसूल केला.  लक्ष्मीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे गुरुकृपा अपार्टमेंट, अजनी चौक, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. भागश्री पॅथलॉजी लेबॉट्ररी रवि नगर, नागपूर यांच्यावर सामान्य कचऱ्यासह जैव कचरा आढळून आल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. राजु किराणा स्टोर्स, टेलिफोन एक्सचेंज चौक, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला.

सतरंजीपुरा झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. अरशद किराणा शॉप, शांती नगर, नागपूर यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. रेनायसेंस कॉलेज, बॅक कॉलोनी, सन्याल नगर, नारी रोड, नागपूर यांच्यावर इलेक्ट्रीक पोलवर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार दंड वसूल करण्यात आला. मंगळवारी झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे मे. टेक्नोक्राट, ओम नगर, नारा रोड, नागपूर व मे. व्हाईट हाऊस बिल्डकॉन, जाफर नगर, नागपूर यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून प्रत्येकी 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ही कारवाई उपद्रव शोध पथक प्रमुख वीरसेन तांबे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 62 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Thu Jul 6 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. बुधवार (05) रोजी शोध पथकाने 62 प्रकरणांची नोंद करून 35000 रुपयाचा दंड वसूल केला. शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com