स्वच्छ भारत अभियान : शोध पथकाची कारवाई

नागपूर :- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने शुक्रवार ता.4) 9 प्रतिष्ठानांवर कारवाई करून 65 हजार रुपयांचा दंड वसूल केला. मनपा आयुक्त तथा प्रशासक राधाकृष्णन बी. यांच्या मार्गदर्शनात धरमपेठ झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून ‍मे. कॉक्रीट डेव्हलपर्स, केअर हॉस्पीटल जवळ, रामदासपेठ, नागपूर यांच्यावर 10 हजार व जादुगर प्रिन्स, रामगोपाल महेश्वरी सांस्कृतीक सभागृह, झांसी राणी चौक सिताबर्डी, यांच्यावर झाडांवर‍ अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून श्री ‍ नारायणी इंन्टरप्राईजेस, कुकडे लेआऊट, नागपूर यांच्यावर 10 हजार, चंपारण मटन ॲन्ड चायनिस फुड, गितांजली सोसायटी, मनिष नगर यांच्यावर अनधिकृतपणे बॅनर व होर्डींग लावल्याबाबत 5 हजार व मिलींद मेश्राम, कुकडे लेआऊट यांच्यावर अनधिकृतपणे रोडवर शेडचे बांधकाम केल्याबाबत 5 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.

गांधीबाग झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने गांधीबाग झोन अंतर्गत ‍ राजु किराणा स्टोअर्स या दुकानावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. लकडगंज झोनच्या उपद्रव शोध पथकाद्वारे प्लास्टिक पिशवी संदर्भात कारवाई करण्यात आली. पथकाने लकडगंज झोन अंतर्गत ‍ मे. मास इथेनिक, प्रभाग क्र. 24, जानकी नगर, पारडी यांच्यावर प्लास्टिक पिशवीच्या वापर केल्याबद्दल कारवाई करून ५ हजार रुपयांचा दंड वसूल केला. सतरंजीपुरा झोन अंतर्गत ‍ मे. रुद्रा कंन्स्ट्रक्शन, जुनी बस्ती, तांडापेठ, इतवारी यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला. आसीनगर झोन अंतर्गत ‍ मे.‍ शिवालिक इन्फ्रा, प्रभाग नं. 07, लकडगंज यांच्यावर रस्त्यालगत बांधकाम साहित्य पसरविल्याबद्दल कारवाई करून 10 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

Contact us for news or articles - dineshdamahe86@gmail.com

NewsToday24x7

Next Post

सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता पसरविणा-या 99 प्रकरणांची नोंद, उपद्रव शोध पथकाची धडक कारवाई

Fri May 5 , 2023
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणाऱ्यांवर, कचरा फेकणाऱ्यांवर, थुंकणाऱ्यांवर, ५० मायक्रॉन पेक्षा कमी प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई ची सुरुवात केली आहे. गुरुवार (4) रोजी शोध पथकाने 99 प्रकरणांची नोंद करून 67500 रुपयाचा दंड वसूल केला.शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी रस्त्यावर, फुटपाथवर कचरा टाकणारे, थुंकणारे, घाण करणारे, लघुशंका करणारे, प्लास्टिक पिशवीचा वापर करणाऱ्या नागरिकांवर तसेच […]

You May Like

Latest News

The Latest News

Social Media Auto Publish Powered By : XYZScripts.com